चार्ट तयार झाल्यानंतरही मिळू शकतं ट्रेनचं कन्फर्म तिकीट, रेल्वेचा खास नियम

Shubham Banubakode

कन्फर्म तिकीट

ट्रेनचा चार्ट तयार झाला तरी कन्फर्म तिकीट मिळू शकतं. त्यामुळे चार्ट बनला म्हणजे आता तिकीट मिळणारच नाही, असं समजू नका.

‘करंट बुकिंग’

चार्ट तयार झाल्यानंतर एखादी सीट किंवा बर्थ रिकामी राहिली, तर रेल्वेच्या ‘करंट बुकिंग’मधून ती बुक करता येऊ शकते.

उपलब्ध जागा

शेवटच्या क्षणी एखाद्या प्रवाशाने तिकीट रद्द केलं किंवा काही कारणाने बर्थ रिकामी राहिली, तर ती जागा पुन्हा उपलब्ध होऊ शकते.

चिंता

करंट बुकिंगमध्ये साधारणपणे कन्फर्म तिकीटच मिळतं. म्हणजे तिकीट बुक केल्यानंतर वेटिंग किंवा आरएसीची चिंता करण्याची गरज नसते.

चार्ट

मात्र चार्ट तयार झाल्यानंतर प्रत्येक ट्रेनमध्ये तिकीट मिळेलच असं नाही. तुमच्या प्रवासाच्या मार्गावर सीट उपलब्ध असणं गरजेचं आहे.

कधी मिळू शकतं तिकीट?

आधी वेटिंग दिसत होती, पण नंतर काही तिकीटं रद्द झाली, तर रिकाम्या जागेवर करंट बुकिंगमधून तिकीट मिळू शकतं.

टीडीआर

चार्ट तयार झाल्यानंतर सामान्य ई-तिकीट नेहमीच्या पद्धतीने ऑनलाइन रद्द करता येत नाही. अशावेळी नियमांनुसार टीडीआरचा पर्याय असू शकतो.

खात्री नाही

तिकीट मिळत नसेल तर ट्रेन सुटण्याआधी एकदा पुन्हा सीटची उपलब्धता तपासा. मात्र करंट बुकिंग म्हणजे तिकीट मिळण्याची खात्री नाही.

अमेरिकेत गवंडी कामाचे किती पैसे मिळतात?

America mason salary

|

esakal

हेही वाचा -