रोज खाल्ले जाणारे 'हे' पदार्थच वाढवतायत पित्त!

Aarti Badade

पित्ताचा त्रास का होतो?

दैनंदिन आहारातील चुकीच्या सवयी आणि काही उष्ण पदार्थांच्या अतिसेवनामुळे शरीरात पित्त दोष वाढून ॲसिडिटी, डोकेदुखी आणि जळजळ यांसारखे त्रास उद्भवतात.

Foods that cause acidity

|

Sakal

पपई - चविष्ट पण उष्ण

पपई चवीला गोड असली तरी ती प्रकृतीने अत्यंत उष्ण असते. रिकाम्या पोटी किंवा अतिप्रमाणात पपई खाल्ल्यास शरीरातील उष्णता आणि पित्त वेगाने वाढू शकते.

Foods that cause acidity

|

Sakal

पपई खाताना 'ही' काळजी घ्या

ज्यांना आधीच उष्णतेचा किंवा पित्ताचा त्रास आहे, अशा व्यक्तींनी पपई बेतानेच खावी. मासिक पाळीशी संबंधित तक्रारी असल्यास पपईचे सेवन जपून करावे.

Foods that cause acidity

|

Sakal

शेंगदाणे आणि पित्ताचा संबंध

शेंगदाणे आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी ते पित्त वाढवण्यास कारणीभूत ठरतात. शेंगदाणे खाल्ल्यानंतर अनेकांना मळमळ किंवा ॲसिडिटी जाणवते.

Foods that cause acidity

|

Sakal

शेंगदाणे खाण्याची योग्य पद्धत

शेंगदाणे खाताना त्यांचे पुढील टोक काढून खावे, कारण त्या भागात पित्त वाढवणारे घटक जास्त असतात. शक्यतो शेंगदाणे शिजवून खाणे अधिक हिताचे ठरते.

Foods that cause acidity

|

Sakal

आल्याचा औषधी वापर

आले पचनासाठी उत्तम असले तरी ते प्रकृतीने उष्ण असते. आल्याचे अतिसेवन केल्यास पोटात जळजळ आणि पित्ताचा त्रास होऊ शकतो.

Foods that cause acidity

|

Sakal

आल्याचे दाहक परिणाम कसे टाळावे?

आल्याचा वापर करताना त्यात थोडे मीठ टाकावे. तसेच आले, गूळ, मध किंवा ताकासोबत घेतल्यास त्याचे उष्ण परिणाम कमी होतात आणि आरोग्य सुधारते.

Foods that cause acidity

|

Sakal

डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा

पित्ताचा त्रास जास्त असेल तर तिखट, तेलकट आणि जंक फूड टाळावे. कोणतेही घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

Foods that cause acidity

|

Sakal

'ही' एक सवय वेगाने वाढवते कोलेस्ट्रॉल! वेळीच सावध व्हा

High cholesterol causes

|

Sakal

येथे क्लिक करा