पुजा बोनकिले
आंबा हे एक असे फळ आहे जे वर्षातून एकदाच खाण्याची मज्जा येते.
उन्हाळ्यात लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वचजण आंबा आणि त्यापासून बनवलेल्या पदार्थांवर ताव मारतात.
आंब्याची चव ही सर्वांनाच आवडणारी असते.
पण फार कमी लोकांना माहिती असेल तर आंब्यासह आंब्याचे पाने देखील आरोग्यादायी आहेत.
आंब्याच्या पानांमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन ए, सी आणि बी असते.
आंब्याची पाने मधुमेहींसाठी खुप फायदेशीर ठरते. तसेच रक्तदाब नियंत्रणात ठेवते. यासाठी आंब्याची पाने वाळवून त्याचे पावडर तयार करा आणि रोज सेवन करा.
आंब्याच्या पानांचा वापर केल्यास केस गळती कमी होते. तसेच केसांची चांगली वाढ होते.यासाठी पानं चांगले उकळावी नंतर थंड झाल्यावर केसांची मसाज करावी.
पोटासंबंधित वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी आंब्याचे पाने फायदेशीर ठरतात. यासाठी रात्री आंब्याची पाने गरम पाण्यात भिजत ठेवा. सकाळी पाणी गाळून प्यावे.
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर आंब्याच्या पानांचा चहा पिऊ शकता. आंब्याची पानं हे मोटाबॉलिज्म बूटर मानले जातात.