महाराष्ट्रातील ‘हा’ किल्ला जिंकण्यात मराठे, इंग्रज, पोर्तुगीजही ठरले अपयशी!

Aarti Badade

ऐतिहासिक जंजिरा किल्ला

रायगड जिल्ह्यात अरबी समुद्राच्या लाटांवर स्वार असलेला मुरुड-जंजिरा किल्ला हा १७ व्या शतकातील एक अभेद्य सागरी दुर्ग आहे. हा किल्ला 'अजिंक्य' म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे.

Murud-Janjira Fort

|

Sakal

अभेद्य तटबंदीचे रहस्य

सिद्दी जोहरने १७ व्या शतकात या बेटावर ही अभेद्य तटबंदी बांधली. मराठे, पोर्तुगीज किंवा ब्रिटीश यांपैकी कोणालाही हा किल्ला युद्धात जिंकता आला नाही.

Murud-Janjira Fort

|

sakal

तीन बलाढ्य तोफा

या किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी येथे 'कलालबंगडी', 'चावरी' आणि 'लांडा कासम' नावाच्या तीन प्रचंड तोफा आजही पाहायला मिळतात. शत्रूला धडकी भरवण्यासाठी या तोफा पुरेसा होत्या.

Murud-Janjira Fort

|

Sakal

खऱ्या समुद्रात गोड्या पाण्याचे तलाव

चहुबाजूंनी खाऱ्या पाण्याचा समुद्र असूनही, या किल्ल्याच्या आत दोन नैसर्गिक गोड्या पाण्याचे तलाव आहेत. ही निसर्गाची एक अद्भूत किमया मानली जाते.

Murud-Janjira Fort

|

Sakal

भव्य बुरुज आणि विस्तार

२२ एकर क्षेत्रफळावर विस्तारलेल्या या किल्ल्याला १९ भक्कम बुरुज आहेत. या बुरुजांमुळे समुद्रातून येणाऱ्या शत्रूवर नजर ठेवणे सोपे व्हायचे.

Murud-Janjira Fort

|

Sakal

किल्ल्याची उंची आणि रचना

किल्ल्याच्या तटबंदीची उंची साधारणपणे ४० फूट (१२ मीटर) आहे. समुद्राच्या लाटा आदळूनही भिंती आजही तितक्याच मजबुतीने उभ्या आहेत. पूर्वेकडील एक गुप्त दरवाजा एक आकर्षण आहे.

Murud-Janjira Fort

|

Sakal

पर्यटनासाठी सर्वोत्तम वेळ

किल्ला सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत पर्यटकांसाठी खुला असतो. उन्हाळ्यात तुम्ही येथे 'वन डे ट्रिप' प्लान करू शकता. मुरुड किनाऱ्यावरून बोटीने जावे लागते.

Murud-Janjira Fort

|

Sakal

शिवरायांच्या स्वराज्यातील ऐतिहासिक रत्न; नक्की भेट द्या पुण्यातील 'या' किल्ल्याला!

Sinhagad Fort Pune

|

Sakal

येथे क्लिक करा