Aarti Badade
उच्च रक्तदाब हा एक अतिशय सामान्य पण अत्यंत घातक सायलेंट किलर आजार बनला आहे, ज्याकडे दुर्लक्ष केल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
High BP Causes Heart Attack
Sakal
रक्तदाब वाढल्याने सुरुवातीला सौम्य लक्षणे दिसतात, परंतु कालांतराने याकडे दुर्लक्ष केल्यास कोणत्याही क्षणी ब्रेन स्ट्रोक, हार्ट अटॅक किंवा किडनीचे गंभीर आजार उद्भवू शकतात.
High BP Causes Heart Attack
Sakal
बीपी वाढल्यामुळे मेंदूच्या नसांवर ताण येतो, ज्यामुळे सकाळी उठल्यानंतर डोक्याच्या मागील भागात तीव्र वेदना होणे, डोके जड होणे किंवा चक्कर येणे अशी लक्षणे दिसतात.
High BP Causes Heart Attack
Sakal
शरीरात रक्त पंप करण्यासाठी हृदयाला जास्तीची मेहनत घ्यावी लागल्यामुळे जिने चढताना, चालताना किंवा अगदी आराम करतानाही छातीत जडपणा आणि वेदना जाणवू लागतात.
High BP Causes Heart Attack
Sakal
उच्च रक्तदाब अचानक वाढल्यानंतर रुग्णाला श्वास घेण्यास प्रचंड त्रास होतो, शरीराला अचानक थंड घाम येतो आणि छातीमध्ये सतत अस्वस्थता निर्माण होते.
High BP Causes Heart Attack
Sakal
रक्तदाब वाढल्याने शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन व रक्तपुरवठा होत नाही, ज्यामुळे सतत तीव्र थकवा जाणवतो, चिडचिड वाढते आणि कामात लक्ष लागत नाही.
High BP Causes Heart Attack
Sakal
चुकीची जीवनशैली, कामाचा अतिताण, फास्ट फूड खाणे, व्यायामाचा अभाव, धूम्रपान, मद्यपान, लठ्ठपणा आणि अपुरी झोप यामुळे शरीरातील रक्तदाब वेगाने वाढतो.
High BP Causes Heart Attack
Sakal
जर तुम्हाला वारंवार डोकेदुखी, छातीत वेदना, धूसर दिसणे किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर घरगुती उपायांवर वेळ न घालवता ताबडतोब डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू करा.
High BP Causes Heart Attack
Sakal
Kidney Failure Early Warning Signs
Sakal