किडनी खराब झाल्यास शरीरात नेमकी कुठे अन् कशी वेदना होते?

Aarti Badade

किडनी

किडनी निकामी किंवा खराब झाल्यास सामान्यतः पाठीच्या खालच्या भागात (कमरेच्या वर), दोन्ही बरगड्यांच्या खाली आणि शरीराच्या बाजूला खोलवर तीव्र वेदना जाणवते.

Kidney Failure Early Warning Signs

|

Sakal

पाठीच्या कण्याकडून वेदना

किडनी पाठीच्या कण्याच्या दोन्ही बाजूंना असल्याने या भागात सतत सुरी खुपसल्यासारखी तीव्र वेदना होते, जी नंतर पुढे पोट, जांघ किंवा पाठीच्या मध्यभागी पसरू शकते.

Kidney Failure Early Warning Signs

|

Sakal

सामान्य पाठदुखी

स्नायू किंवा पाठीच्या कण्यातील वेदना वाकल्यावर किंवा वजन उचलल्यावर वाढतात; मात्र किडनीशी संबंधित असणारे दुखणे अतिशय तीव्र, असह्य आणि सतत जाणवणारे असते.

Kidney Failure Early Warning Signs

|

Sakal

लघवी करताना जळजळ होणे

जर पाठीच्या वेदनेसोबत लघवी करताना तीव्र जळजळ होत असेल किंवा लघवीचा रंग बदलून तो लाल किंवा जास्त गडद झाला असेल, तर हे किडनी खराब होण्याचे मुख्य लक्षण आहे.

Kidney Failure Early Warning Signs

|

Sakal

लघवीच्या प्रमाणात बदल

लघवी अचानक कमी-जास्त प्रमाणात किंवा वारंवार होणे, तसेच शरीरातील विषारी घटक बाहेर न पडल्यामुळे डोळे, हात आणि पायांवर स्पष्ट सूज येणे हा किडनी निकामी होण्याचा इशारा आहे.

Kidney Failure Early Warning Signs

|

Sakal

सतत मळमळ, उलट्यांचा त्रास होणे

पोटाच्या आणि बरगड्यांच्या खालच्या वेदनेसोबत जर रुग्णाला सतत मळमळत असेल, भूक मंदावली असेल आणि उलट्यांचा त्रास होत असेल तर ताबडतोब वैद्यकीय तपासणी करावी.

Kidney Failure Early Warning Signs

|

Sakal

तीव्र ताप येणे, थंडी वाजणे

किडनीमध्ये गंभीर संसर्ग (Infection) झाल्यास रुग्णाला थंडी वाजून तीव्र ताप येतो आणि शरीरातील हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे सतत प्रचंड थकवा किंवा अशक्तपणा जाणवतो.

Kidney Failure Early Warning Signs

|

Sakal

डॉक्टरांचा सल्ला घ्या

जर पाठीच्या गंभीर वेदनेसोबत यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास घरगुती उपाय न करता त्वरित नेफ्रॉलॉजिस्ट (किडनी तज्ज्ञ) डॉक्टरांना भेटून योग्य उपचार सुरू करा.

Kidney Failure Early Warning Signs

|

Sakal

रोज सकाळी लसूण खाल्ल्याने Blood Sugar कमी होते का? जाणून घ्या वैज्ञानिक तथ्य

Garlic vs Metformin for Diabetes

|

Sakal

येथे क्लिक करा