Aarti Badade
उच्च रक्तदाब (High BP) हा अत्यंत शांतपणे वाढणारा आजार असून जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरातील कोट्यवधी लोक या समस्येने त्रस्त आहेत.
High BP Symptoms
Sakal
सकाळी उठल्यानंतर डोक्याच्या मागच्या भागात डोकेदुखी जाणवत असेल आणि ती दिवसभरात कमी होत असेल, तर ते हाय बीपीचे सुरुवातीचे मुख्य लक्षण असू शकते.
High BP Symptoms
Sakal
रक्तदाब वाढल्यामुळे हृदयाला शरीरात रक्त पोहोचवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते, ज्यामुळे पुरेशी झोप घेतल्यानंतरही शरीराला सतत थकवा जाणवतो.
High BP Symptoms
Sakal
जिने चढताना, थोडं चालल्यावर किंवा रोजची घरकामं करतानाही जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर याकडे कधीही दुर्लक्ष करू नका.
High BP Symptoms
Sakal
वातावरण किंवा ॲलर्जीचे कोणतेही स्पष्ट कारण नसताना जर तुम्हाला वारंवार नाकातून रक्त येण्याचा त्रास होत असेल, तर वेळीच रक्तदाब तपासून घेणे गरजेचे आहे.
High BP Symptoms
Sakal
रक्तदाब वाढल्यामुळे डोळ्यांतील नाजूक रक्तवाहिन्यांवर तीव्र ताण येतो, ज्यामुळे दृष्टी अचानक धूसर होणे किंवा डोळ्यांभोवती दाब जाणवणे अशी लक्षणे दिसतात.
High BP Symptoms
Sakal
हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका टाळण्यासाठी योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या, मिठाचे प्रमाण कमी करा आणि नियमित व्यायाम करून रक्तदाब नियंत्रणात ठेवा.
High BP Symptoms
Sakal
Type 2 Diabetes Early Signs
Sakal