मधुमेहाचा गंभीर इशारा! पायांवरील ‘या’ लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

Aarti Badade

हाय ब्लड शुगर आणि पाय

रक्तातील साखर वाढते, तेव्हा रक्ताभिसरण मंदावते आणि पायांच्या नसा कमजोर होतात. यामुळे साध्या जखमेचे रूपांतर मोठ्या संसर्गात होऊ शकते, ज्याला 'डायबेटिक फूट' म्हणतात.

Diabetic foot symptoms

|

Sakal

पाय स्वच्छ ठेवण्याची योग्य पद्धत

दररोज कोमट पाणी आणि सौम्य साबणाने पाय स्वच्छ धुवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, धुऊन झाल्यानंतर पायांच्या बोटांमधील जागा नीट कोरडी करा; बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो.

Diabetic foot symptoms

|

Sakal

दररोज करा पायांची तपासणी

मधुमेहामध्ये नसा सुन्न झाल्यामुळे जखम झाल्याचे कळत नाही. त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी पायावर सूज, लालसरपणा, फोड किंवा नवीन जखम आहे का, हे आरशाच्या मदतीने तपासा.

Diabetic foot symptoms

|

Sakal

मॉइश्चरायझरचा

टाचा आणि तळव्यांना मॉइश्चरायझर जरूर लावा जेणेकरून भेगा पडणार नाहीत. पण, पायांच्या बोटांच्या फटीमध्ये क्रीम लावू नका; तिथे ओलावा राहिल्यास संसर्ग वाढण्याचा धोका असतो.

Diabetic foot symptoms

|

Sakal

नखे कापताना

नखे नेहमी सरळ कापा आणि खूप खोलवर कापू नका. जर तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल किंवा नसांचा त्रास असेल, तर स्वतः नखे न कापता घरच्यांची किंवा तज्ज्ञांची मदत घ्या.

Diabetic foot symptoms

|

Sakal

योग्य पादत्राणांची निवड

घट्ट किंवा कडक चप्पल-बूट वापरणे टाळा. नेहमी मऊ, कुशन असलेले आणि पायाला योग्य मापाचे बूट वापरा. घरातही अनवाणी चालणे टाळा, जेणेकरून पायाला इजा होणार नाही.

Diabetic foot symptoms

|

Sakal

मऊ मोज्यांचे महत्त्व

नेहमी स्वच्छ आणि मऊ सुती (Cotton) मोजे वापरा. यामुळे पायांचे घर्षण कमी होते आणि पाय बाहेरील धूळ-मातीपासून सुरक्षित राहतात.

Diabetic foot symptoms

|

Sakal

'हे' धोक्याचे संकेत ओळखा!

पाय सतत सुन्न वाटत असतील, जखम भरून येत नसेल किंवा पायाचा रंग बदलत असेल, तर घरगुती उपाय न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Diabetic foot symptoms

|

Sakal

युरीन इन्फेक्शनची लक्षणं ओळखा वेळीच; महिलांसाठी ठरू शकतो गंभीर आजार!

UTI symptoms in women

|

Sakal

येथे क्लिक करा