Aarti Badade
युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) म्हणजे किडनी, मूत्राशय आणि मूत्रनलिकेला होणारा जंतुसंसर्ग. महिलांमध्ये मूत्रमार्ग लहान असल्याने त्यांना याचा धोका पुरुषांपेक्षा जास्त असतो.
UTI symptoms in women
sakal
कमी पाणी पिणे, बराच वेळ लघवी रोखून ठेवणे आणि स्वच्छतेचा अभाव ही सर्वात मोठी कारणे आहेत. यामुळे जंतू शरीराबाहेर न पडता आतच वाढू लागतात.
UTI symptoms in women
Sakal
शौचानंतर चुकीच्या पद्धतीने साफसफाई करणे, घट्ट किंवा सिंथेटिक कपडे वापरणे आणि मासिक पाळीत स्वच्छता न राखणे यामुळे जंतू मूत्रमार्गात सहज शिरकाव करतात.
UTI symptoms in women
Sakal
वारंवार लघवीला जावे लागणे, लघवी करताना जळजळ किंवा आग होणे, लघवीचा रंग गडद होणे आणि दुर्गंधी येणे ही UTI ची प्राथमिक लक्षणे आहेत.
UTI symptoms in women
Sakal
जर मूत्राशयातील संसर्गावर वेळीच उपचार झाले नाहीत, तर जंतू किडनीपर्यंत पोहोचतात. यामुळे किडनी इन्फेक्शन होऊन ती कायमची निकामी होण्याचा धोका असतो.
UTI symptoms in women
Sakal
तीव्र ताप, थंडी वाजून येणे, मळमळ, उलट्या आणि पाठीत खालच्या बाजूला तीव्र वेदना होणे हे संसर्ग किडनीपर्यंत पोहोचल्याचे संकेत आहेत. अशा वेळी त्वरित डॉक्टरांकडे जा.
UTI symptoms in women
Sakal
गर्भारपणात होणारे युरीन इन्फेक्शन बाळासाठीही धोकादायक ठरू शकते. यामुळे अकाली प्रसूती होण्याचा धोका वाढतो.
UTI symptoms in women
Sakal
दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्या.लघवी कधीही रोखून धरू नका.सुती (Cotton) अंतर्वस्त्रे वापरा.लघवीच्या जागेची स्वच्छता नेहमी समोरून पाठीमागच्या दिशेने करा.
UTI symptoms in women
Sakal
मधुमेही रुग्णांमध्ये हा संसर्ग रक्तात पसरून जीवावर बेतू शकतो. त्यामुळे घरगुती उपायांसोबतच डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटीबायोटिक्सचा कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे.
UTI symptoms in women
Sakal
Benefits of ghee for skin
Sakal