किडनी फेल होण्यामागे बीपी की शुगर? जास्त धोका कोणाकडून?

Aarti Badade

शरीराचे 'सायलेंट किलर'

उच्च रक्तदाब (High BP) आणि रक्तातील जास्त साखर हे दोन्ही आजार शरीराला आतून पोखरतात आणि याचा सर्वाधिक परिणाम मूत्रपिंडांवर होतो.

BP vs Sugar for kidneys

|

Sakal

रक्तदाब वाढल्यावर काय होते?

जेव्हा रक्तदाब वाढतो, तेव्हा मूत्रपिंडातील अत्यंत नाजूक आणि लहान रक्तवाहिन्या अरुंद होतात, ज्यामुळे किडनीची कार्यक्षमता कमी होते.

BP vs Sugar for kidneys

|

Sakal

हळूहळू होणारे नुकसान

उच्च रक्तदाबामुळे किडनीला होणारे नुकसान खूप वर्षे समजत नाही, कारण याची सुरुवातीला कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. हा परिणाम अत्यंत संथ गतीने होतो.

BP vs Sugar for kidneys

|

sakal

डायलिसिसची वेळ?

जर रक्तदाब वेळेवर नियंत्रित केला नाही, तर किडनी कायमची निकामी होऊन डायलिसिस किंवा किडनी ट्रांसप्लांट करण्याची गरज भासू शकते.

BP vs Sugar for kidneys

|

Sakal

हाय शुगरचा किडनीवर ताण

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यावर किडनीला ती बाहेर काढण्यासाठी जास्त काम करावे लागते. यामुळे किडनीमधील लहान फिल्टर्सवर प्रचंड दबाव येतो.

BP vs Sugar for kidneys

|

Sakal

ओळखा हे पहिले लक्षण

लघवीतून प्रथिने (Proteins) बाहेर पडणे हे हाय शुगरमुळे किडनीला होणाऱ्या नुकसानीचे पहिले लक्षण आहे. याला 'डायबेटिक किडनी डिसीज' असेही म्हणतात.

BP vs Sugar for kidneys

|

Sakal

दोन्हीपैकी जास्त धोकादायक काय?

डॉक्टरांच्या मते, हाय शुगरमुळे किडनीचे नुकसान तात्काळ आणि तीव्र स्वरूपाचे असते, तर हाय बीपीचा परिणाम संथ पण दीर्घकालीन असतो.

BP vs Sugar for kidneys

|

Sakal

सर्वात घातक स्थिती

जेव्हा एखाद्या रुग्णाला बीपी आणि शुगर हे दोन्ही आजार एकत्र होतात, तेव्हा किडनी निकामी होण्याचा वेग दुप्पट वाढतो. ही स्थिती सर्वात गंभीर मानली जाते.

BP vs Sugar for kidneys

|

SAKAL

किडनी कशी वाचवाल?

तुमची शुगर आणि रक्तदाब नियमितपणे तपासत राहा. सकस आहार, व्यायामाची जोड आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेतल्यास किडनी सुरक्षित राहते.

BP vs Sugar for kidneys

|

sakal

पाण्याचे महत्त्व

किडनीचे आरोग्य जपण्यासाठी दररोज पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. जर तुम्हाला काहीही त्रास जाणवला, तर त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

BP vs Sugar for kidneys

|

Sakal

'ही' एक सवय वेगाने वाढवते कोलेस्ट्रॉल! वेळीच सावध व्हा

High cholesterol causes

|

Sakal

येथे क्लिक करा