साधं दुखणं समजू नका...शरीराच्या ‘या’ भागांत वेदना म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढलंय!

Aarti Badade

कोलेस्ट्रॉल : एक सायलेंट किलर

वाढलेले कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा करते, ज्यामुळे हृदयाकडे जाणारा रक्तप्रवाह खंडित होतो. भविष्यात हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचे कारण ठरू शकतो.

High cholesterol symptoms

|

Sakal

छातीत वेदना किंवा जळजळ

रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे हृदयाला रक्त पोहोचवण्यासाठी जास्त कष्ट करावे लागतात. छातीत वारंवार जळजळ, दडपण किंवा असह्य वेदना जाणवू शकतात. हृदयविकाराचे मुख्य लक्षण आहे.

High cholesterol symptoms

|

Sakal

मानेत आणि खांद्यामध्ये जडपणा

सतत मानेत ताण किंवा खांद्यामध्ये वेदना होत असतील, तर सावध व्हा. कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात, परिणामी या भागात पुरेसा ऑक्सिजन पोहोचत नाही आणि वेदना सुरू होतात.

High cholesterol symptoms

|

Sakal

पाय आणि टाच

चालताना पाय दुखणे किंवा टाचांमध्ये सतत ठणका लागणे हे खराब कोलेस्ट्रॉलचे संकेत असू शकतात. पायांच्या नसांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही.

High cholesterol symptoms

|

Sakal

कंबर आणि पाठ

कंबरदुखीला आपण अनेकदा सामान्य समजतो, पण कोलेस्ट्रॉल वाढल्याने मणक्याच्या भागातील रक्तप्रवाह विस्कळीत होतो. यामुळे कोणत्याही कारणाशिवाय दीर्घकाळ पाठदुखीचा त्रास होऊ शकतो.

High cholesterol symptoms

|

Sakal

हातापायांच्या बोटांत मुंग्या येणे

हातापायांची बोटे सुन्न होणे किंवा मुंग्या येणे हे रक्ताभिसरण खराब झाल्याचे लक्षण आहे. जेव्हा रक्तवाहिन्यांत चरबी साचते, तेव्हा टोकाच्या अवयवांना ऑक्सिजन कमी मिळतो आणि बधीरपणा जाणवतो.

High cholesterol symptoms

|

Sakal

काय कराल उपाय?

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश करा, तेलकट पदार्थ टाळा आणि दररोज किमान ३० मिनिटे वेगाने चाला. नियमित व्यायामाने खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

High cholesterol symptoms

|

Sakal

डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा

वरिलपैकी कोणतेही लक्षण दीर्घकाळ जाणवत असेल, तर घरगुती उपाय करण्याऐवजी त्वरित 'लिपिड प्रोफाईल' टेस्ट करून घ्या आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू करा.

High cholesterol symptoms

|

Sakal

डायबिटीज असणाऱ्यांनी 'हे' पदार्थ खाऊच नये! तज्ज्ञांनी सांगितली लिस्ट

Foods to avoid in diabetes

|

Sakal

येथे क्लिक करा