Aarti Badade
शरीरातील नायट्रोजनयुक्त पदार्थांचे विघटन होऊन तयार होणारे द्रव्य म्हणजे युरिक अॅसिड.
महिलांमध्ये युरिक अॅसिडची सामान्य पातळी 2.4 ते 6.0 mg/dL दरम्यान असावी.
6.0 mg/dL पेक्षा जास्त झाल्यास संधिवात, सांधेदुखी, किडनी स्टोनचा धोका वाढतो.
10 mg/dL पेक्षा अधिक युरिक अॅसिड हे गंभीर स्थितीचे लक्षण असून डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.
सांधेदुखी, सूज, मूत्रात जळजळ, थकवा आणि तीव्र वेदना ही लक्षणे सामान्यतः दिसून येतात.
अति प्रथिनांचा आहार, कमी पाणी पिणे, मद्यपान आणि आनुवंशिकता ही मुख्य कारणे.
लो-पुरिन आहार, भरपूर पाणी, नियमित व्यायाम आणि स्ट्रेस कमी करणे उपयुक्त ठरते.
वेळोवेळी युरिक अॅसिड तपासणी केल्याने समस्या ओळखता येते आणि वेळेवर उपचार होतात.