Aarti Badade
केस विंचरताना किंवा धुताना काही प्रमाणात केस गळणे हे सामान्य आहे. पण जेव्हा टक्कल पडू लागते, तेव्हा ती गंभीर समस्या ठरते.
आहारातील पोषकतत्त्वांची कमतरता, ताण-तणाव, झोपेचा अभाव, हार्मोन्सचे असंतुलन – हे सर्व कारणं केस गळण्यामागे असू शकतात.
आयुर्वेदानुसार, रोझमेरी तेल टाळूमधील रक्ताभिसरण वाढवते, ज्यामुळे केसांच्या मुळांना योग्य पोषण मिळते.
संशोधनात सिद्ध झाले आहे की रोझमेरी तेल मिनॉक्सिडिलइतकेच प्रभावी ठरते – हे औषध डॉक्टर केसांच्या वाढीसाठी सुचवतात.
रोझमेरी तेल थेट वापरणे टाळा. फक्त ४ थेंब नारळ तेल किंवा एरंडेल तेलात मिसळा आणि टाळूला हलक्या हाताने मसाज करा.
यामुळे टक्कल असलेल्या भागातही केस उगमास सुरुवात होते. केस मजबूत होतात, कोंडा कमी होतो आणि चमक वाढते.
रोझमेरी तेल केवळ केसांसाठी नव्हे, तर त्वचेसाठीही लाभदायक आहे. ते त्वचेला हायड्रेट करतं आणि नैसर्गिक चमक देतं.