Pranali Kodre
इंग्लंडने १२ सप्टेंबर रोजी मँचेस्टरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी२० सामन्यात स्फोटक फलंदाजी केली.
Phil Salt - Harry Brook
Sakal
फिल सॉल्टने केलेल्या नाबाद १४१ आणि जोस बटलरच्या ८३ धावांच्या खेळींच्या जोरावर इंग्लंडने २० षटकात २ बाद ३०४ धावा केल्या.
Phil Salt - Jos Buttler
Sakal
आयसीसीच्या पूर्ण सदस्य असलेल्या संघाविरुद्ध एखाद्या संघाने टी२० सामन्यात ३०० धावांचा टप्पा पार करण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
Phil Salt
Sakal
दरम्यान आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये तिसऱ्यांदा ३०० धावांचा टप्पा पार झाला असून इंग्लंड एका टी२० डावात सर्वोच्च धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा संघ ठरला.
Phil Salt
Sakal
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये इंग्लंडपूर्वी झिम्बाब्वे आणि नेपाळ संघांनी ३०० धावांचा टप्पा पार केला आहे.
Phil Salt
Sakal
अव्वल क्रमांकावर झिम्बाब्वे असून त्यांनी २३ ऑक्टोबर २०२४ मध्ये गॅम्बियाविरुद्ध २० षटकात ४ बाद ३४४ धावा केल्या होत्या.
Zimababwe
Sakal
नेपाळने मंगोलियाविरुद्ध २७ सप्टेंबर २०२३ मध्ये ३ बाद ३१४ धावा केल्या होत्या. ही आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.
Nepal
Sakal
सर्वोच्च धावा करण्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावरील इंग्लंडपाठोपाठ चौथ्या क्रमांवर भारतील संघ असून त्यांनी १२ ऑक्टोबर २०२४ रोजी बांगलादेशविरुद्ध हैदराबादमध्ये ६ बाद २९७ धावा केल्या होत्या.
Team India
Sakal
पाचव्या क्रमांकावर पुन्हा झिम्बाब्वे असून त्यांनी सेशेल्स संघाविरुद्ध १९ ऑक्टोबर २०२४ रोजी ५ बाद २८६ धावा केल्या होत्या.
Zimababwe
Sakal
Shubman Gill - Abhishek Sharma
Sakal