T20I मध्ये डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारे ४ भारतीय

Pranali Kodre

भारताचा विजय

आशिया कप २०२५ मध्ये भारताने UAE विरुद्ध ९ विकेट्सने विजय मिळवला.

Team India

|

Sakal

फक्त २७ चेंडूत विजय

५८ धावांचे आव्हान भारताने ४.३ षटकात १ विकेट गमावत ६० धावात पूर्ण केले.

Shubman Gill - Abhishek Sharma

|

Sakal

अभिषेक शर्माचा षटकार

या धावांचे लक्ष्य पूर्ण करताना भारताच्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्माने हैदर अलीविरुद्ध षटकार मारला.

Abhishek Sharma

|

Sakal

चौथा भारतीय

त्यामुळे अभिषेक शर्मा आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये डावाच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारणारा चौथा भारतीय ठरला.

Abhishek Sharma

|

Sakal

रोहित शर्मा

यापूर्वी रोहित शर्माने २०२१ मध्ये अहमदाबादमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना आदिल राशिदने टाकलेल्या डावाच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता.

Rohit Sharma

|

Sakal

यशस्वी जैस्वाल

यशस्वी जैस्वालने हरारेमध्ये झिम्बाब्वविरुद्ध सिकंदर रझाने टाकलेल्या डावाच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता.

Yashasvi Jaiswal

|

Sakal

संजू सॅमसन

संजू सॅमसनने मुंबईत इंग्लंडविरुद्ध जोफ्रा आर्चरने टाकलेल्या डावाच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता.

Sanju Samson

|

Sakal

असा कॅप्टन होणे नाही! Asia Cup मधील एक विक्रम जो फक्त MS Dhoni च्याच नावावर आहे

Captain MS Dhoni Asia Cup Record

|

Sakal

येथे क्लिक करा