Best FD Return Bank : या बँका देतात तुमच्या ठेवीवर सर्वाधिक व्याजदर!

सकाळ डिजिटल टीम

सुरक्षित आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय

गुंतवणूकदारांसाठी फिक्स्ड डिपॉजिट (FD) म्हणजे सुरक्षित आणि निश्चित परतावा देणारा पर्याय आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय म्हणून FD निवडतात.

FD

|

Sakal

FD घेण्यापूर्वी व्याजदर तुलना महत्त्वाची


FD साठी वेगवेगळ्या बँकांचे दर थोडेफार वेगवेगळे असतात. यात फक्त 50 बेसिस पॉइंट्सचा फरकही मोठा फायदा देऊ शकतो. 20 लाखांच्या 3 वर्षांच्या FD गुंतवणुकीवर ₹30,000 चा फायदा होतो.

FD Calculation

|

Sakal

HDFC Bank

नियमित सामान्य ग्राहकांसाठी 6.45% तर ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवीवर 6.95% इतका व्याजदर दिला जातो.

HDFC

|

sakal

ICICI Bank

नियमित ग्राहकांसाठी 6.6% तर ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या ठेवीवर ICICI Bank 7.2% व्याजदर देते.

ICICI

|

Sakal

Kotak Mahindra Bank

नियमित ग्राहकांसाठी 6.4% तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.9% व्याजदर देते. पण जर ठेवीचा कालावधी 391 दिवस ते 2 वर्षांदरम्यान असेल तर सामन्यांसाठी 6.7% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.2% इतका व्याजदर दिला जातो.

Kotak Mahindra Bank

|

Sakal

Federal Bank

सामान्यांसाठी 6.7% तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.2% इतका व्याजदर दिला जातो. जर FD 3 वर्षांपेक्षा जास्त काळासाठी असेल तर मोठा व्याजदर दिला जातो.

Fedral Bank

|

Sakal

Union Bank of India

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये Union Bank of India ही नियमित ग्राहकांसाठी 6.6% तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.1% व्याजदर देते.

union bank

|

Sakal

State Bank Of India

सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक SBI नियमित ग्राहकांसाठी 6.3% तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.8% व्याजदर दिला जातो. तर 2–3 वर्षे कालावधी असेल तर 6.45%, आणि 6.95% इतका व्याजदर मिळतो.

SBI

|

Sakal

Canara Bank

नियमित ग्राहकांसाठी 6.25% तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.75% व्याजदर देते. कालावधी जर 444 दिवस असेल तर 6.5% आणि 7% इतका व्याजदर दिला जातो.

Canara Bank

|

Sakal

UPI Happy Customer.

|

Sakal

बापरे! आता बँक बॅलेन्स Zero असतानाही पेमेंट शक्य? जाणून घ्या काय आहे UPI Credit Line