Swadesh Ghanekar
आयपीएल इतिहासात हा दुसरा सर्वात मोठ्या धावांचा केलेला यशस्वी पाठलाग ठरला.
अभिषेक शर्मा व ट्रॅव्हिस हेड ( ६६) यांनी १२.२ षटकांत १७१ धावांची सलामी दिली.
अभिषेक शर्माने ५५ चेंडूंत १४ चौकार व १० षटकारांच्या मदतीने १४१ धावा चोपल्या.
आयपीएल इतिहासातील ही तिसरी सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या ठरली.
अभिषेकने काल क्विंटन डी कॉकचा नाबाद १४० धावांचा ( वि. KKR, २०२२) विक्रम मोडला.
एबी डिव्हिलियर्स नाबाद १३३ धावांसह ( वि. मुंबई इंडियन्स, २०१५) या विक्रमात पाचवा आहे.
ख्रिस गेलने २०१३ मध्ये पुणे वॉरियर्स इंडिया संघाला चोपले होते आणि तो या लिस्टमध्ये टॉपर आहे.
ब्रेंडन मॅक्युलमने पहिल्या पर्वात RCB विरुद्ध नाबाद १५८ धावांची वादळी खेळी केली होती. तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.