आईस्क्रिम खायची म्हणून... रोहितनं सांगितलं पत्नी रितिकाला कसं केलेलं हटके प्रपोज

Pranali Kodre

रोहित शर्मा - रितिका सजदेह

भारतीय संघाचा स्टार रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका एक लोकप्रिय जोडपं आहे. रोहितने रितिकाला ज्या पद्धतीने प्रपोज केलं होतं, त्याची कहाणीही रंजक आहे.

Rohit Sharma proposal to Wife Ritika Sajdeh | Sakal

प्रपोजलची कहाणी

नुकतंच रोहितने युट्युबवरील 'Who’s The Boss?' या शोमध्ये त्याने रितिकाला कसं प्रपोज केलं याची कहाणी सांगितली.

Rohit Sharma proposal to Wife Ritika Sajdeh | Sakal

पहिलं क्रिकेट मैदान

रोहित म्हणतो, रितिका त्या जागी नेलं जिथून त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती.

Rohit Sharma proposal to Wife Ritika Sajdeh | Sakal

आइसक्रीम खायला जाऊया!

रोहितने पुढे सांगितले की 'आम्ही मरीन ड्राइव्हवर होतो. तिने आणलेलं घरचं जेवण जेवलो. त्यानंतर मी तिला म्हणालो की कंटाळा आलाय आइस्क्रीम खायला जाऊया.'

Rohit Sharma proposal to Wife Ritika Sajdeh | Sakal

अज्ञात प्रवास

रोहितच्या गाडीने मरीन ड्राईव्हहून हाजी अली, वरळी पार केलं. त्यावेळी रितिकाने विचारलं, "आइसक्रीम कुठे आहे?" त्यावर रोहित म्हणाला, ‘बोरिवलीला एक मस्त दुकान आहे. तू कधी आलेली नाहीस, चल दाखवतो.’

Rohit Sharma proposal to Wife Ritika Sajdeh | Sakal

बोरिवलीतलं अंधारातलं मैदान

रोहित तिला एका ग्राउंडवर घेऊन गेला, जिथे पूर्ण अंधार होता. तिला ते ग्राउंड आहे हेच सुरुवातीला कळलं नाही.

Rohit Sharma proposal to Wife Ritika Sajdeh | Sakal

आधीच आखलेली योजना

रोहितने आपल्या मित्राला आधीच तिथे तयारी करायला आणि प्रपोजलचा क्षण टिपायला सांगितलं होतं.

Rohit Sharma proposal to Wife Ritika Sajdeh | Sakal

पिचच्या मध्यावर प्रपोज

रोहित रितिकाला घेऊन पिचच्या मध्यावर गेला आणि त्याने गुडघ्यावर बसून तिला लग्नाची मागणी घातली.

Rohit Sharma proposal to Wife Ritika Sajdeh | Sakal

अविस्मरणीय क्षण

रितिका आणि रोहित म्हणतात, तो अविस्मरणीय क्षण होता.

Rohit Sharma proposal to Wife Ritika Sajdeh | Sakal

लग्न

रोहित आणि रितिका यांनी १३ डिसेंबर २०१५ रोजी लग्न केलं. त्यांना आता समायरा आणि आहान ही मुलं आहेत.

Rohit Sharma proposal to Wife Ritika Sajdeh | Sakal

भारताचा स्टार क्रिकेटर झाला जुळ्या मुलांचा बाबा; फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

Nitish Rana Blessed with Twin Sons | Instagram
येथे क्लिक करा