हिमाचलच्या कुशीत वसलाय 'हा' निसर्गरम्य स्वर्ग; डोळ्याचे पारणे फेडणारे आहे सौंदर्य!

सकाळ डिजिटल टीम

'तीर्थन हिल स्टेशन'

जर तुम्ही सुट्टीसाठी शांत, निसर्गरम्य आणि गर्दीपासून दूर असलेल्या ठिकाणाचा विचार करत असाल, तर हिमाचल प्रदेशातील 'तीर्थन हिल स्टेशन' हे ठिकाण तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.

Tirthan Hill Station

सौंदर्य-शांतीचा अनोखा संगम

पंजाबमधील पटियालापासून अवघ्या २६७ किलोमीटर अंतरावर वसलेले हे हिल स्टेशन सौंदर्य आणि शांतीचा एक अनोखा संगम आहे.

Tirthan Hill Station

निसर्गरम्य कुशीत वसलेलं 'तीर्थन'

हिमाचलच्या निसर्गरम्य कुशीत वसलेले तीर्थन, तुमच्या मनाला मोहवून टाकणारे दृश्यमान सौंदर्य आणि नितांत सुंदर हवामान देणारे ठिकाण आहे.

Tirthan Hill Station

मन प्रफुल्लित करणारे धबधबे

तीर्थन हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून सुमारे ६२२ मीटर उंचीवर स्थित आहे. येथील मन प्रफुल्लित करणारे हिरवेगार जंगल, डोंगराळ भाग आणि वाहणारे धबधबे तुमचे स्वागत करतात.

Tirthan Hill Station

शांततेचा अनुभव

या ठिकाणी येणारे पर्यटक प्रामुख्याने शांततेचा अनुभव घेण्यासाठी, निसर्गाच्या सान्निध्यात काही निवांत क्षण घालवण्यासाठी आणि भटकंतीसाठी येतात.

Tirthan Hill Station

दूरवरून लोक येथे येतात

दूरवरून लोक येथे येण्याची योजना करतात, कारण इथे अनुभवायला मिळणारे दृश्य अद्वितीय आणि नेत्रदीपक असते.

Tirthan Hill Station

पुन्हा-पुन्हा येण्याची इच्छा निर्माण होते

तुमच्या पुढील हिमाचल भेटीच्या यादीत तीर्थन हिल स्टेशनचे नाव निश्चितपणे समाविष्ट करा, कारण हे ठिकाण एकदा पाहिल्यानंतर पुन्हा-पुन्हा येण्याची इच्छा निर्माण होते.

Tirthan Hill Station

साताऱ्याच्या बामणोली डोंगरात लपलंय हेमाडपंथी मंदिर; 1000 वर्षांची आध्यात्मिकता अन् अद्वितीय शिल्पकला

Pateshwar Temple Satara | esakal
येथे क्लिक करा