Apurva Kulkarni
ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देताना रॉकीनं हिनाचा संपूर्ण आधार बनून साथ दिली.
2012 पासून एकत्र असलेलं हे प्रेम अखेर 4 जून 2025 रोजी विवाहबंधनात अडकलं.
रॉकी हा फिल्ममेकर आहेत. त्यांचं स्वतःचं प्रोडक्शन हाउस – 'हिरोज फॉर बेटर फिल्म' या नावाचं आहे.
'ये रिश्ता क्या कहलाता है', 'साथ निभाना साथिया' यांसारख्या मालिकांत सुपरवायझिंग प्रोड्यूसर म्हणून त्यांनी काम केलंय.
त्यांचा क्लोथिंग ब्रँड देखील आहे. अंदाजे 6-7 कोटींच्या संपत्तीचे ते मालक आहेत.
हिना मुस्लिम असून रॉकी हिंदू आहेत, पण त्यांच्या प्रेमात धर्म आड आला नाही.
हिना आणि रॉकीच्या लग्नाच्या बातमीने सोशल मीडियावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.