Anuradha Vipat
टीव्ही अभिनेत्री हिना खान कॅन्सरशी झुंज देत आहे.
नुकताच हिनाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आता हिनाने कॅन्सरच्या उपचारांबाबतचा तिचा थरारक अनुभव शेअर केला आहे.
हिनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक फोटो शेअर केला आहे.
हा फोटो शेअर करत दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
मागील १५-२० दिवस शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप कठीण होते असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.
पुढे जखमा आल्या आणि मी न घाबरता त्यांचा सामना केला. शेवटी मी शारिरीक सीमांच्या आणि मानसिक आघाताला कशी बळी पडले असते. मी त्यांच्याशी लढले आणि लढत राहिन. खरा आनंद मिळेल या आशेने मी सर्व गोष्टी करत आहेअसे हिना म्हणाली.