Apurva Kulkarni
हिना खानने 'गृहलक्ष्मी' सीरिजमधील काही फोटो शेअर केले आहे. ज्यात हिनाचा एक वेगळा अंदाज पहायला मिळाला आहे.
या फोटोमध्ये हिना खान एक साधी गृहिणी असल्याचं दिसत आहे. फोटोमध्ये तिने सुती साडी घातली आहे.
काही फोटोमध्ये ती बाजारातून भाजी घेताना सुद्धा दिसत आहे. हे तिचे सर्व फोटो 'गृहलक्ष्मी' सीरिजमधील आहेत.
एका फोटोमध्ये हिना कपाळावर टिकली, बांधलेले केस आणि प्रिंटेड साडी घातलेली पाहयला मिळतेय.
हिना खान या सिरीजमध्ये मोलकरीणचा अभिनय करत आहे. जी मोलकरणीपासून गृहलक्ष्मी कशी होते? ते या सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे.
दरम्यान हिना खान मोठ्या आजारातून जात आहे. तिला थर्ड स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर झालेला आहे.
हिना खान नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.