सकाळ डिजिटल टीम
हिंदू धर्मात सणांना एक विषेश महत्त्व आहे. श्रवन महिण्यात येणाऱ्या नगनागपंचमी या सणाचे देखील हिंदू धर्मात एक आगळे-वेगळे महत्त्व आहे. या सणाचे महत्त्व आणि कथा जाणून घ्या.
हिंदू धर्मात नागांना देवता मानले जाते. ते भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांच्याशी संबंधित आहेत. शंकराच्या गळ्यात नाग असतो, तर विष्णू शेषनागावर विराजमान असतात. यामुळे नागांना पूजनीय मानले जाते.
अनेक पौराणिक कथांमध्ये नागांचा उल्लेख आहे. शेषनाग, वासुकी, तक्षक असे अनेक नाग हे देवतांचे अंश किंवा त्यांचे भक्त मानले जातात.
नाग हे निसर्गातील महत्त्वाचे घटक आहेत. ते शेतीत उंदरांसारख्या कीटकांवर नियंत्रण ठेवून पिकांचे रक्षण करतात. त्यामुळे नागांची पूजा करून एकप्रकारे निसर्गाचा समतोल राखण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते.
साप चावल्याने होणाऱ्या मृत्यूचे भय दूर करण्यासाठीही नागांची पूजा केली जाते, अशी समजूत आहे. नागांना शांत केल्याने त्यांच्यापासून होणारा धोका टळतो, अशी लोकांची श्रद्धा आहे.
भगवान श्रीकृष्णाने यमुना नदीत कालिया नावाच्या विषारी नागाचा पराभव करून लोकांचे रक्षण केले. या विजयाच्या स्मरणार्थ नागपंचमी साजरी केली जाते. कालिया नागाने कृष्णाची शरणागती पत्करल्यानंतर त्याला अभय मिळाले. अशी माण्यता आहे.
महाभारत काळात राजा जनमेजयाने सर्पयज्ञ केला होता, कारण त्याच्या पित्याचा मृत्यू एका सर्पदंशामुळे झाला होता. या यज्ञातून सर्व सर्पांचा नाश होत होता, तेव्हा आस्तिक मुनींनी हस्तक्षेप करून सर्पांचे रक्षण केले. ज्या दिवशी सर्पांना अभय मिळाले, तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो.
नागपंचमी हा सण केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित नाही, तर तो निसर्गातील जीवजंतूंबद्दल आदरभाव व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या संरक्षणाचा संदेश देतो.
या दिवशी महिला नागांची पूजा करून कुटुंबाच्या संरक्षणाची आणि समृद्धीची प्रार्थना करतात. हा सण कुटुंबात सुख-शांती आणणारा मानला जातो.