Yashwant Kshirsagar
हिंदू धर्मात मृत्यूनंतर मृत व्यक्तीला मुखाग्नी दिला जातो. पण तुम्हाला माहित आहे का मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार नेहमी मुलगाच का करतो?
गरुड पुराणानुसार घरातील एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला तर फक्त मुलगा, भाऊ किंवा एखाद्या जवळच्या पुरुषालाच अंत्यसंस्काराचा अधिकार आहे.
याचे खास कारण देखील आहे, अंत्यसंस्कार हे वंशपरंपरेचा एक भाग आहे. त्यामुळे अत्यंसंस्काराचा अधिकार त्यांनाचा दिला जातो जे आजीवन वंशांची संबंधित आहेत.
मुलगी विवाहानंतर दुसऱ्या कुटूंबात जाते त्यामुले तिला मृत व्यक्तीला मुखाग्नी देण्याचा अधिकार नसतो.
तसेच मृत्यूनंतर कुटुंबातील लोक पितृ बनतात आणि कोणत्याही सदस्याच्या अंत्यसंस्कारात वंशाचा सहभाग असणे अनिवार्य आहे.
त्यामुळे केवळ मुलगाच अंत्यसंस्कार करु शकतो. काही प्रकरणात मुलगा किंवा भाऊ नसेल तर मुली पण अंत्यसंस्कार करु शकतात.
शास्त्रानुसार पुत्र शब्दातील पु म्हणजे नरक आणि त्र म्हणजे त्राण
यानुसार पुत्र याचा अर्थ नरकातून परत आणणारा असा होतो. याच कारणामुळे घरातील मृत व्यक्तीला मुखाग्नी देण्यासाठी पुत्राला प्राधान्य दिले जाते.