Yashwant Kshirsagar
आपल्या किचनमध्ये अनेक ड्राय फ्रूटस पाहायला मिळतात, यामध्ये पोषक गुण असतात, यातील एक अंजिरात देखील व्हिटामिन आणि मिनरल्स आढळतात.
अंजिर आरोग्यासाठी एक वरदान आहे. ड्राय अंजिर खाऊ शकता तसेच ते भिजवूनही खाऊ शकता. अंजिर भिजवून खाण्याचे अनेक फायदे आहेत.
भिजवलेल्या अंजिराच्या पाण्यात सॉल्युबल फायबर असते. यामुळे पचनाच्या समस्या दूर होतात. यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचनाची समस्या दूर होते.
अंजिरात अॅंटिऑक्सिडेंट्स मोठ्या प्रमाणात असतात. यात पॉलिफेनॉल नावाचे अॅंटिऑक्सिडेंट असते जे शरीरातील उती खराब होण्यापासून वाचवते.
अंजिरात अनेक प्रकारचे कम्पाउंड आढळतात जे रक्तातील साखर नियंत्रित करतात. तसेचे इन्सुलिनची मात्रा वाढवतात
अंजिरात फायबरचे प्रमाणात जास्त असते त्यामळे शुगर चांगल्या प्रकारे मॅनेज होते.
ज्या महिलांना मासिक पाळी अनियमित येते त्यांच्यासाठी अंजिर आणि त्याचे पाणी देखील फायदेशीर ठरते.