सकाळ वृत्तसेवा
देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सावरकरांच्या आठवणी आजही प्रेरणा देतात.
मुंबईच्या दादरमधील छत्रपती शिवाजी पार्क परिसरात, बालमोहन विद्यामंदिर शेजारी – डॉ. मधुकर बी. राऊत मार्गावर ही वास्तू आहे.
१० मे १९३७ – सावरकरांची रत्नागिरीतील नजरकैदेतून सुटका झाली.
सुरुवातीस त्यांनी गणेश पेठ लेनमधील सावरकर भुवनमध्ये वास्तव्य केलं.
गणेश पेठमधील घर विकून त्यांनी प्लॉट नं. ७१ (शिवाजी पार्क) खरेदी केला – किंमत ₹7548!
इथेच सावरकर सदनाचं बांधकाम सुरू झालं.
तळमजला + पहिला मजला + गच्ची – अशी साधी रचना. बांधकाम सुरू असताना भास्कर भुवनमध्ये काही काळ वास्तव्य.
जून १९३८ मध्ये कुटुंबासह सावरकरांचा या घरात प्रवेश झाला. पत्नी माई, कन्या प्रभात, पुत्र विश्वास आणि बंधूंचा समावेश होता.
१९४७ – भारत स्वतंत्र झाला तेव्हा गच्चीवर तिरंगा आणि भगवा ध्वज फडकवला.
१९६६ मध्ये याच इमारतीत त्यांचं निधन झालं.
१९४८ मध्ये गांधीहत्येनंतर सावरकर सदनावर हल्ला झाला होता. माई सावरकरांच्या निधनानंतर अंगणात तुळशीचं वृंदावन बांधलं गेलं.
सावरकरांचे मानपत्र, जुने फोटो, साहित्य – आजही इथं जतन केलं आहे. सावकरांची जयंती व पुण्यतिथी दरवर्षी इथे साजरी होते.