Aarti Badade
1927 मध्ये सायमन कमिशन भारतात आला. एकही भारतीय सदस्याची निवड न झाल्याने देशभरातून या कमिशनला विरोध झाला.
1928 मध्ये या विरोधानंतर प्रांतिक समिती स्थापन झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भास्करराव जाधव यांची त्यात निवड झाली.
भारतीय राजकीय हक्कांसाठी जगभरातील संविधानांचे वाचन आणि त्यांची तुलना गरजेची होती.
५ ऑगस्ट १९२८ रोजी निवड होताच बाबासाहेबांनी प्रा. पी.ए. वाडिया यांच्यासोबत पुस्तकं खरेदी केली. ती पुस्तके खरेदी करण्यासाठी त्यांनी 400 रुपये उधार घेतले होते.
राज्यघटनांचा अभ्यास शांततेत करता यावा म्हणून स्वतःला खोलीत कोंडले.
लोकांच्या अडथळ्यांपासून दूर राहण्यासाठी बाहेरून कुलूप आणि खिडकीतून जेवणाची सोय ठेवली.
एका इराणी हॉटेलमधून फक्त चहा आणि जेवण देण्यास त्यांनी सांगितले. बाकी पूर्ण वेळ अभ्यासात स्वतःला गुंतवून घतेले.
सतत १४ दिवस त्यांनी राज्यघटनांचा गाढा अभ्यास केला. कोणत्याही व्यत्ययाशिवाय.
याच त्यांच्या सखोल अभ्यासामुळे भारताची अखंड राज्यघटना तयार झाली
भीमराव रामजी आंबेडकर खंड दुसरा या पुस्तकात चांगदेव खैरमोडे यांनी ही घटना विस्तृतपणे वर्णन केली आहे.