19 एकर परिसरात पसरलेल्या पुण्यातील ‘या’ ऐतिहासिक वास्तूला नक्की भेट द्या!

Aarti Badade

राष्ट्रीय अस्मितेचे केंद्र

पुण्यातील 'आगाखान पॅलेस' हे केवळ एक भव्य बांधकाम नसून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका महत्त्वपूर्ण अध्यायाचे केंद्र आहे.

Aga Khan Palace Pune history

|

Sakal

चलेजाव'

१९४२ च्या 'चलेजाव' आंदोलनावेळी हा पॅलेस राष्ट्रीय राजकारणाचा केंद्रबिंदू बनला होता.

Aga Khan Palace Pune history

|

Sakal

दुष्काळग्रस्तांसाठी उभारलेला आधार

१८९२ च्या भीषण दुष्काळात स्थानिकांना रोजगार मिळावा, या उदात्त हेतूने आगाखान तृतीय यांनी या पॅलेसचे बांधकाम केले.

Aga Khan Palace Pune history

|

Sakal

हजारो लोकांना

१९ एकर परिसरात पसरलेल्या या वास्तूत हजारो लोकांना अन्न व धान्याचे वाटप करण्यात आले होते.

Aga Khan Palace Pune history

|

Sakal

स्थापत्यशैलीचा संगम

तीन मजली असलेल्या या ऐतिहासिक वास्तूवर युरोपियन आणि पर्शियन बांधकाम शैलीचा स्पष्ट प्रभाव दिसून येतो. २००३ मध्ये भारत सरकारने या वास्तूला 'राष्ट्रीय स्मारक' म्हणून घोषित केले.

Aga Khan Palace Pune history

|

Sakal

गांधीजींची नजरकैद

१९४२ च्या आंदोलनादरम्यान महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेव देसाई आणि सरोजिनी नायडू यांना येथे नजरकैदेत ठेवले होते.

Aga Khan Palace Pune history

|

Sakal

पत्रकार

याच काळात अनेक दिग्गज नेते आणि विदेशी पत्रकार गांधीजींच्या भेटीला पुण्यात येत असत.

Aga Khan Palace Pune history

|

Sakal

कस्तुरबा आणि महादेवभाईं

नजरकैदेत असतानाच १५ ऑगस्ट १९४२ रोजी गांधीजींचे साहाय्यक महादेव देसाई आणि २२ फेब्रुवारी १९४४ रोजी कस्तुरबा गांधी यांचे निधन झाले.

Aga Khan Palace Pune history

|

Sakal

समाधी

या दोघांच्या समाधी आजही या पॅलेसच्या शांत अंगणात पाहायला मिळतात.

Aga Khan Palace Pune history

|

Sakal

गांधीजींच्या आठवणींचे संग्रहालय

पॅलेसमध्ये आज गांधीजींच्या वास्तव्यावर आधारित भव्य प्रदर्शन आहे. सहा दालनांमध्ये विभागलेल्या या प्रदर्शनात दुर्मिळ फोटो, वस्तू आणि माहितीपट द्वारे स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास जिवंत होतो.

Aga Khan Palace Pune history

|

Sakal

पुण्याला भेट देताना नक्की पहा!

पुणे-नगर रस्त्यावर स्थित असलेले हे स्मारक सकाळी ९ ते ५.३० या वेळेत पर्यकांसाठी खुले असते.

Aga Khan Palace Pune history

|

Sakal

ऐतिहासिक

२० रुपये प्रवेश शुल्कात आपण या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक ऊर्जेने भरलेल्या वास्तूचा अनुभव घेऊ शकता.

Aga Khan Palace Pune history

|

sakal

मुघलांना होतं इराणच्या 'या' खास गोष्टीचं आकर्षण; वाट्टेल तेव्हा ऑर्डर करायचे

Mughals import from Iran Persian influence

|

Sakal

येथे क्लिक करा