Saisimran Ghashi
पुणे रेल्वे स्थानकाला 167 वर्षे पूर्ण होत असून 14 जून 1858 रोजी येथे नियमित रेल्वे वाहतूक सुरू झाली.
सुरुवातीला पुणे-खंडाळा आणि नंतर पुणे-दौंड या ब्रॉड गेज मार्गांवर रेल्वे चालू झाली.
27 जुलै 1925 रोजी पुणे स्थानकाच्या सध्याच्या मुख्य इमारतीचे उद्घाटन झाले.
1886 मध्ये घोरपडी ते कोरेगाव (सातारा) मीटर गेज मार्ग सुरू झाला.
स्थानकात तीन फलाट, पादचारी पूल, उतरत्या शेड आणि विशिष्ट व्यक्तींकरिता छोटे फलाट होते.
मालगाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग आणि लोकोशेडचीही व्यवस्था तीन नंबर फलाटाच्या पलीकडे होती.
1925 मध्ये प्रशस्त इमारत बांधून फलाटांची संख्या वाढवली गेली आणि 1928-29 मध्ये मार्गाचे विद्युतीकरण झाले.
आजही पुणे जंक्शनवर सुमारे दीडशेहून जास्त गाड्या चालतात आणि नवीन टर्मिनलद्वारे त्यावरील ताण कमी केला जात आहे.