Saisimran Ghashi
पेशवा बालाजी बाजीराव यांना नानासाहेब पेशवे म्हणून ओळखले जाते. ते पहिले बाजीराव पेशवे यांचे पुत्र होते.
नानासाहेब यांनी इ.स. १७४० ते १७६१ या काळात मराठा साम्राज्याचे पेशवे म्हणून कार्य केले.
त्यांचा जन्म 1721 सालात झाला होता
त्यांनी पुण्याचा विकास एक राजकीय आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून केला. त्यांच्या कारकिर्दीत अनेक विहिरी, घाट, मंदिरे आणि सार्वजनिक इमारती बांधल्या गेल्या.
त्यांनी दिल्लीत मराठ्यांचा प्रभाव प्रस्थापित केला आणि मुघल सम्राटांना नियंत्रणात ठेवले. त्यांची कारकीर्द साम्राज्य विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली.
त्यांच्या काळात मराठा साम्राज्याची अर्थव्यवस्था मजबूत झाली आणि स्वराज्याचे नाणे (शिक्का) जारी करण्यात आले.
पानिपत युद्धातील पराभवानंतर मनस्तापामुळे नानासाहेब यांनी स्वतःला सार्वजनिक जीवनातून दूर केले आणि काही वर्षांत त्यांचे निधन झाले (इ.स. १७६१)
आज 23 जुन रोजी नानासाहेब पेशवे यांचा 264 वा स्मृतिदिन आहे