मुघलांची नर्तकी कशी बनली दिल्लीची मालकीण?

संतोष कानडे

नर्तकी ते बेगम

'फरझाना' नावाच्या एका नर्तकीने दिल्लीत स्वतःचा जम बसवला आणि स्वतःचं सैन्य तयार केलं होतं. तिने एका युरोपियन सेनापतीशी लग्न करून सत्ता मिळवली.

स्वतःचे सैन्य

नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिने तीन हजार युरोपियन व भारतीय सैनिकांच्या आधुनिक तुकडीचे कमांडर म्हणून नेतृत्व केले.

युद्धात सहभाग

फरझाना ही केवळ महालात बसली नाही, तर स्वतः घोड्यावर बसून, हातात तलवार घेऊन प्रत्यक्ष युद्धात उतरायची.

ख्रिश्चन बेगम

तिने कॅथलिक ख्रिश्चन धर्म स्वीकारून जोहाना नोबिलिस सोम्ब्रे असे नाव धारण केले. ती मुघल काळातील एकमेव ख्रिश्चन महिला शासक ठरली.

स्वतंत्र राज्य

तिच्या लष्करी ताकदीमुळे मुघल सम्राटाने तिला दिल्लीजवळील 'सरधना' (मेरठ) प्रांताची अधिकृत मालकीण (शासक) बनवले.

मुघल राजाची रक्षक

लाल किल्ल्यावर शत्रूंनी हल्ला केला तेव्हा तिने आपल्या तोफखान्यासह धावून जात मुघल सम्राटाचा जीव वाचवला.

राजाची आई

या उपकारामुळे मुघल सम्राट तिला आदराने 'आपली आई' मानू लागला आणि तिला 'झिब-उन-निसा' (महिलांचे भूषण) पदवी दिली.

अफाट संपत्ती

तिच्या चतुर कारभारामुळे सरधनाचा महसूल प्रचंड वाढला आणि ती त्या काळातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक बनली.

भव्य चर्चची निर्मिती

तिने कोट्यवधी रुपये खर्च करून सरधना येथे आशियातील सर्वात मोठ्या ऐतिहासिक चर्चची (बॅसिलिका) निर्मिती केली.

अंत

इंग्रजांच्या राजवटीतही तिने आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवले आणि १८३६ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी एका स्वतंत्र राणीसारखा तिचा अंत झाला.

केवळ एका निर्णयाने उद्ध्वस्त झालेलं मराठा साम्राज्य

<strong>येथे क्लिक करा</strong>