छत्रपतींचा गुप्तवास असलेले ऐतिहासिक गाव समोर; वाडे, तलाव आणि मंदिरे आजही कायम

Sandip Kapde

इतिहास

खुद्द स्वराज्याचे छत्रपती ज्या गावात काही काळ वास्तव्यास होते ते ऐतिहासिक गाव म्हणजे पानगांव, ता. बार्शी, जि. सोलापूर होय.

Historic Village of the Chhatrapati

|

esakal

गुप्तवास

स्वराज्याचे पाचवे छत्रपती रामराजे महाराज काही काळ पानगाव येथे गुप्तपणे राहिले होते.

Historic Village of the Chhatrapati

|

esakal

कालखंड

इ.स. १७४५ ते १७५० या पाच वर्षांच्या काळात त्यांनी पानगावात गुप्त वास्तव्य केले.

Historic Village of the Chhatrapati

|

esakal

नाते

रामराजे महाराज आपल्या थोरल्या बहिणी दर्याबाईसाहेब नाईक निंबाळकर यांच्या घरी राहत होते.

Historic Village of the Chhatrapati

|

esakal

सल्ला

 १७५० मध्ये रामराजे गादीवर बसले, बहीण दर्याबाई निंबाळकर या अडचणीच्या वेळी त्यांना सल्ला देत.

Historic Village of the Chhatrapati

|

esakal

सासर

पानगाव हे दर्याबाईसाहेब यांचे सासर होते आणि तेथेच रामराजे महाराजांनी काही काळ घालवला.

Historic Village of the Chhatrapati

|

esakal

पराक्रम

दर्याबाईसाहेब यांनी स्वराज्यासाठी अनेक वेळा तलवार हाती घेऊन रणांगण गाजवले.

Historic Village of the Chhatrapati

|

esakal

सरसेनापती

दर्याबाईसाहेब यांचे पती निंबाजीराव नाईक निंबाळकर हे स्वराज्याचे सरसेनापती होते.

Historic Village of the Chhatrapati

|

esakal

राज्यकारभार

पुढे इ.स. १७५० ते १७७७ या काळात रामराजे महाराजांनी स्वराज्याचे छत्रपती म्हणून राज्यकारभार सांभाळला.

Historic Village of the Chhatrapati

|

esakal

वारसा

छत्रपती रामराजे, सरसेनापती आणि अनेक थोर सरदारांच्या वास्तव्यामुळे पानगावाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले.

Historic Village of the Chhatrapati

|

esakal

स्मृती

या गावात आजही त्या काळाच्या आठवणी जपणारे अनेक ऐतिहासिक ठसे दिसून येतात.

Historic Village of the Chhatrapati

|

esakal

स्थळे

पानगावात हत्ती तलाव, थोर व्यक्तींच्या समाध्या आणि प्राचीन मंदिरे आजही इतिहासाची साक्ष देत उभी आहेत.

Historic Village of the Chhatrapati

|

Esakal

शिवरायांची दखनी भाषेतील दुर्मिळ बखर उजेडात, मिरजेत मोठा शोध!

Chhatrapati Shivaji Maharaj

|

esakal

येथे क्लिक करा