सकाळ डिजिटल टीम
गेल्या काही आठवड्यांपासून कोल्हापुरी चप्पल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारणही तसं खास आहे.
इटालियन फॅशन ब्रँड प्राडा यांनी मिलान फॅशन वीकमध्ये कोल्हापुरी चप्पलपासून प्रेरित एक खास डिझाइन प्रदर्शित केलं.
आश्चर्याची बाब म्हणजे, ही डिझाइन लाखो रुपयांच्या किमतीत विक्रीस ठेवण्यात आली, ज्यामुळे मोठी खळबळ उडाली.
मात्र, भारतात या चप्पलांची किंमत इतकी जास्त नसते. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कारागीर शतकानुशतके ही कला जपत आले आहेत.
कोल्हापुरी चप्पल साधारणपणे 500 ते 1,000 रुपयांमध्ये सहज मिळू शकते.
इतिहास सांगतो की, कोल्हापुरी चप्पल पूर्वी फक्त राजे-महाराजे वापरत असत; पण कालांतराने ती सामान्य लोकांच्या पायांवरही शोभू लागली.
असे मानले जाते, की १२ व्या किंवा १३ व्या शतकापासून भारतात कोल्हापुरी चप्पल बनवण्याची परंपरा सुरू आहे.