संतोष कानडे
इतिहासामध्ये अनेक विचित्र घडामोडी घडलेल्या आहेत. काही देशांनी, राज्यांनी प्रजेवर अनोखे कायदे लागू केले होते.
प्राचीन काळात काही ठिकाणी लोकांना विशिष्ट कपडेच घालण्याची परवानगी होती. आदेश मोडला तर थेट तुरुंगवास.
Ancient Rome मध्ये सामान्य लोकांना जांभळ्या रंगाचे कपडे घालण्यास बंदी होती, कारण तो रंग राजघराण्यासाठी राखीव होता.
मध्ययुगीन युरोपमध्ये काही ठिकाणी लोकांना ठराविक वेळेनंतर घराबाहेर पडण्यास मनाई होती, तसे केले तर सैनिक उचलून नेत असत.
इंग्लंडमध्ये एकेकाळी संसदेत मरणे बेकायदेशीर मानले जायचे.. हा फारच विचित्र कायदा होता.
काही देशांमध्ये दाढी ठेवण्यासाठीसुद्धा कर भरावा लागत होता. Peter the Great ने रशियात दाढीवर कर लावला होता.
काही ठिकाणी महिलांना विशिष्ट प्रकारचे कपडे घालण्यावर मर्यादा होत्या.. हे प्रकार मध्ययुगीन इतिहासात चालत असत
अशा कायद्यांमुळे समाजावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जात असे.
आज हे कायदे रद्द झाले असले तरी ते इतिहासातील विचित्र आणि रंजक भाग म्हणून ओळखले जातात.