संतोष कानडे
मुघलांचा जनानखाना म्हणजे त्यांच्या हक्काच्या स्त्रीयांना ठेवण्याची जागा. 'जनानखाना' हा मुघल महलातील अत्यंत सुरक्षित आणि गुप्त भाग होता
जनानखान्यात केवळ बादशहा आणि त्यांच्या जवळच्या कुटुंबातील स्त्रियांनाच जाण्याची परवानगी होती.
जनानखान्यात सम्राटाच्या अनेक पत्नी, त्यांच्या माता, बहिणी, मुली, दासी आणि शेकडो इतर बादशहाच्या खास स्त्रिया एकत्र राहत असत.
या खासगी जागेच्या सुरक्षेची जबाबदारी अत्यंत कडक असायची; बाहेरील सुरक्षेसाठी राजपूत सैनिकांची तर अंतर्गत सुरक्षेसाठी 'किन्नर' आणि सशस्त्र महिला रक्षकांची नियुक्ती केली जाई.
जनानखान्यातील महिलांना त्यांच्या दर्जानुसार आणि नात्यानुसार स्वतंत्र महाल, भत्ते आणि महागड्या भेटवस्तू दिल्या जात असत.
वरकरणी शांत दिसणाऱ्या या जनानखान्यात पडद्यामागून अनेक मोठे राजकीय कटकारस्थान आणि सत्तेचा संघर्ष चालत असे.
साम्राज्याचा पुढील वारसदार कोण होणार, याचे अनेक महत्त्वाचे निर्णय जनानखान्यातील शक्तिशाली महिलांच्या प्रभावातून घेतले जात.
अकबराची आई हमीदा बानो आणि शाहजहानची मुलगी जहाँआरा बेगम यांसारख्या महिलांचा जनानखान्यासह मुघल राजकारणावर मोठा दबदबा होता.
जनानखान्यातील मुख्य राणीला 'पादशहा बेगम' किंवा 'मलिक-ए-झमान' ही सर्वोच्च पदवी दिली जाई, जी संपूर्ण जनानखान्यावर नियंत्रण ठेवायची.
येथील महिला केवळ महालात बंदिस्त नव्हत्या, तर त्या व्यापार, कला, वास्तुकला आणि आंतरराष्ट्रीय करारांमध्येही स्वतःचे निर्णय घेत असत.
थोडक्यात सांगायचे तर, मुघल जनानखाना ही केवळ बादशहाची विलासी जागा नव्हती, तर ते मुघल साम्राज्याची सत्ता आणि राजकारण चालवणारे एक मुख्य छुपं केंद्र होतं.