सकाळ डिजिटल टीम
बॅडमिंटन या खेळाची सुरूवात कधी आणि कशी झाली तुम्हाला माहित आहे का?
बॅडमिंटन या खेळाचा इतिहास काय आहे? या बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.
बॅडमिंटनचा उगम 1800 च्या दशकात ब्रिटिश सैन्यात तैनात असलेल्या अधिकाऱ्यांनी भारतात 'पूना' नावाचा खेळ खेळून झाली.
1873 मध्ये ड्यूक ऑफ ब्युफोर्टने 'पूना' हा खेळ इंग्लंडमध्ये आणला, जिथे त्याचे नाव 'बॅडमिंटन' झाले.
1899 मध्ये पहिली 'ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा' झाली, जी जगातील पहिली बॅडमिंटन स्पर्धा मानली जाते.
1972 मध्ये म्युनिक ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन प्रात्यक्षिक खेळ म्हणून सादर करण्यात आला आणि 1992 मध्ये बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये अधिकृतपणे ऑलिम्पिक स्पर्धेत त्याचा समावेश करण्यात आला.
1934 मध्ये आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघ (आता बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन) ची स्थापना झाली, ज्यामुळे या खेळाच्या जागतिक विस्तारास मदत झाली.
भारतात बॅडमिंटनची सुरुवात 1800 च्या दशकात झाली, जेव्हा ब्रिटिश अधिकारी 'पूना' खेळ खेळत होते.
भारतातील अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे, जसे की प्रकाश पदुकोण, सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू.