Saisimran Ghashi
एक पुरातन दस्तावेज शिवाजी महाराजांच्या आग्र्यालगतच्या घटनांचे वर्णन करतो, जो मिर्झाराजे जयसिंगच्या दरबारात असलेल्या प्रकालदासने लिहिला.
छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर आग्र्यात प्रवेश करत आहेत, त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने सैनिक, हाथी आणि घोडे आहेत. असेही वर्णन त्यात आहे.
हा दस्तावेज राजस्थानच्या बिकानेर म्युझियममध्ये जतन केला गेला आहे, जो ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे.
राजस्थानच्या राजघराण्यांच्या अनेक दस्तावेजांचा संग्रह याच म्युझियममध्ये आहे, ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महत्त्वाचा आहे.
शिवाजी महाराजांना दिल्ली दरबारात अपमानित करण्यात आले, त्यांचा सन्मान केला गेला नाही, असे प्रकालदास यांनी लिहिलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी रामसिंहला इन्कलाबचा इशारा दिला आणि त्यानंतर दरबारातून बाहेर पडले.हे घटनांचे वर्णन महेंद्रसिंह खडगावत यांनी म्युझियममध्ये जतन केलेले दस्तावेज वाचून केले आहे.
म्युझियममध्ये शिवाजी महाराजांच्या युद्ध, तह, आणि शौर्याची गाथा सांगणारी महत्त्वाच्या नोंदी आहेत.
पुरंदरच्या तहाच्या कागदावर शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचे विवरण, शस्त्रांची माहिती आणि शुल्क वसूली संदर्भात तपशील आहेत.
पुरंदर तहाच्या कागदाची जीर्ण अवस्था सुधारून, त्या कागदावर प्रक्रिया केली आणि म्युझियममध्ये तो जतन केला गेला.
संदर्भ : बिकानेर दस्तावेज संग्रहालय,राजस्थान