आत्तापर्यंत कोणत्या संघांनी ICC स्पर्धेतील सामन्यांवर टाकलाय बहिष्कार?

Pranali Kodre

भारताविरुद्ध पाकिस्तान खेळणार नाही

टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत पाकिस्तान संघ १५ फेब्रुवारीला भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यावर बहिष्कार टाकेल, असं पाकिस्तान सरकारकडून सांगण्यात आलं आहे,

India vs Pakistan

|

Sakal

यापूर्वीही घडल्यात अशा घटना

दरम्यान, आयसीसी स्पर्धांमध्ये किंवा स्पर्धेतील सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा हा पहिलाच निर्णय नाही, यापूर्वी अगदी ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज अशा संघांनीही यापूर्वी घेतला आहे.

Pakistan

|

Sakal

बांगलादेशला टी२० वर्ल्ड कपमधून काढलं

बांगलादेशने टी२० वर्ल्ड २०२६ स्पर्धा खेळण्यासाठी सुरक्षिततेच्या कारणाने भारतात येणार नसल्याचे जाहीर केले, त्यामुळे आयसीसीने त्यांना स्पर्धेतून बाहेर काढून स्कॉटलंडला संधी दिली.

Bangladesh

|

Sakal

ऑस्ट्रेलियाचा खेळण्यास नकार

१९९६ वनडे वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेत मोठ्या बॉम्बस्फोटानंतर सुरक्षेच्या कारणाने खेळण्यास नकार दिला होता. त्यावेळी श्रीलंकेला गुण मिळाले होते.

Australia

|

Sakal

वेस्ट इंडिजचाही खेळण्यास नकार

ऑस्ट्रेलियासह १९९६ वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजनेही श्रीलंकेत जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे श्रीलंका सामना न खेळताही उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले होते.

West Indies

|

Sakal

इंग्लंडनेही टाकलेला बहिष्कार

२००३ वर्ल्ड कपवेळी इंग्लंडने मुकाबे राजवटीचा निषेध म्हणून झिम्बाब्वेमध्ये त्यांच्या सामन्यावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे त्यांना सुपर सिक्समधील जागा गमवावी लागली होती.

England Cricket Team

|

Sakal

न्यूझीलंडनेही टाकलेला बहिष्कार

२००३ वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडने नैरोबीत दहशतवादी धोक्यांच्या हवाला देत केनियाविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला होता, ज्यामुळे केनिया सेमीफायनलमध्ये पोहचले होते.

New Zealand

|

Sakal

झिम्बाब्वेने घेतलेली माघार

२००९ टी२० वर्ल्ड कपवेळी युके सरकारने झिम्बाब्वेच्या खेळाडूंचे व्हिसा राजकीय तणावामुळे नाकारले होते. त्यामुळे झिम्बाब्वेने या स्पर्धेतून माघार घेतली होती.

Zimbabwe

|

Sakal

सर्वाधिक T20I धावा करणारे टॉप-५ फलंदाज; विराट-कोहली कोणत्या क्रमांकवर?

Virat Kohli - Rohit Sharma

|

Sakal

येथे क्लिक करा