कच्चं तेल सगळ्यात आधी कसं आणि कुठे सापडलं?

संतोष कानडे

प्राचीन

प्राचीन काळात इराण-इराकच्या भागात कच्च्या तेलाचे नैसर्गिक झरे असायचे. जमिनीवरुन तेल वहायचं. प त्याचे फारसे उपयोग कुणाला माहिती नसायचे.

एडविक ड्रेक

जगामध्ये खऱ्या अर्थाने व्यावायिक स्वरुपात तेलाचा शोध १८५९ मध्ये लागला. एडविक ड्रेक यांना याचं श्रेय जातं.

अमेरिका

अमेरिकेतल्या पेनसिल्व्हेनिया इथे १८५९ साली कच्चं तेल सापडलं. ड्रेक यांनी मिठाच्या विहिरी खोदण्याचं तंत्रज्ञान वापरुन तेलाची विहीर खोदली.

तेलाचा साठा

२७ ऑगस्ट १८५९ रोजी ड्रेक यांनी ६९ फूट खोलीवर कच्च्या तेलाचा मोठा साठा सापडला. हाच काळ आधुनिक पेट्रोलियम युगाची सुरुवात ठरला.

पेनसिव्हेनिया

तेल सापडल्याची बातमी कळताच पेनसिव्हेनियामध्ये ऑईल रश सुरु झाला. हजारो लोक रातोरात श्रीमंत होण्याचं स्वप्न बघू लागले आणि जमिनी खरेदी करु लागले.

रॉकेफेलर

पुढे जॉन डी. रॉकेफेलर यांनी तेलाचा उद्योग उभा केला. त्यांनी १८७० मध्ये स्टँडर्ड ऑईल नावाची कंपनी स्थापन केली.

शुद्धीकरण

या कंपनीने केवळ तेल काढलं नाही तर शुद्धीकरणावर आणि तेलाच्या वाहतुकीवर भर दिला. पुढे हे रॉकेफेलर हे जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले.

रशिया

पुढे रशियातील बाकू येथेही तेलाचे मोठमोठे साठे सापडले. त्यामुळे अमेरिकेची एकाधिकारशाही संपली.

अँग्लो-पर्शियन

मध्यपूर्वेत तेलाचा मोठा साठा इराणध्ये (१९०८) सापडला. त्यातूनच अँग्लो-पर्शियन ऑईल कंपनी जन्माला आली.

सौदी अरेबिया

१९३८ मध्ये सौदी अरेबिया येथे अमेरिकन कंपन्यांनी तेलाचा जागातला सर्वात मोठा साठा शोधला. त्यामुळेच जगाचे राजकारण बदलून गेले.

अमेरिकेने डागलेली मिसाईल इराणमध्ये पोहोचायला किती वेळ लागतो?

<strong>येथे क्लिक करा</strong>