संतोष कानडे
सध्या इराण-अमेरिका या देशांमध्ये युद्ध सुरु आहे. इस्रायलदेखील इराणवर क्षेपणास्त्र सोडत आहे. काही क्षेपणास्त्रांना वरच्या वर निष्प्रभ केलं जातं.
मिसाईल नेमकं कोठून डागलं आहे, त्यावरुन ते इच्छित ठिकाणावर पडण्यासाठी किती वेळ लागतो, हे ठरतं. शिवाय त्याचा वेगही महत्त्वाचा असतो.
जर अमेरिकेने कतार, बहरीन, कुवेत यांसारख्या देशांमधील तळावरुन हल्ला केला तर अंतर कमी असते.
या देशांतून इराणच्या तळांवरील अंतर ३०० ते ५०० किलोमीटर पडते. त्यामुळे साधारण मिसाईल्स पोहोचायला ५ ते १० मिनिटांचा वेळ लागतो.
अनेकदा नौदलाच्या काही युद्धनौका किंवा पाणबुड्या इराणच्या किनारपट्टीजवळच असतात. त्यामुळे त्यावरुन डागलेले मिसाईल इराणमध्ये बरोबर लक्ष्यावर पोहोचते.
क्रूझ मिसाईल्सचा वेग हा ध्वनीच्या वेगापेक्षा कमी असतो, त्यामुळे लक्ष्यावर पोहोचण्यासाठी मिसाईल्सला २० मिनिटांपासून १ तासांपर्यंत वेळ लागू शकतो.
आता प्रत्यक्ष अमेरिकेमधून म्हणजे नॉर्थ डकोटा किंवा कॅलिफॉर्निया इथून क्षेपणास्त्र डागलं तर ते पृथ्वीच्या अर्ध्या भागाचा प्रवास करतं.
त्यासाठी क्षेपणास्त्राला ३० मिनिटांचा वेळ लागतो. त्याचा वेग साधारण २४ हजार किलोमीटर प्रतितास म्हणजे ध्वनीच्या वेगापेक्षा कितीतरी पटीने जास्त असतो.