दिवाळी बोनसचा ब्रिटिशांशी काय आहे संबंध? जाणून घ्या

Pranali Kodre

बोनस

दिवाळीत कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो. पण हा बोनस देण्याची प्रथा चालू कधी व कशी झाली आणि त्याचा ब्रिटिशांशी काय संबंध जाणून घेऊ.

Diwali Bonus History

|

Sakal

Weekly Salary

खरंतर स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातील गिरण्या आणि कारखान्यांमध्ये कर्मचाऱ्यांना आठवड्याच्या हिशोबाने पगार (Weekly Salary) दिला जात होता. त्यामुळे एका वर्षात कर्मचाऱ्यांना ५२ आठवड्यांचा पगार मिळत होता.

Diwali Bonus History

|

Sakal

Monthly Salary

मात्र, ब्रिटिशांनी प्रशासकीय सोयीसाठी मासिक पगार देणे सुरू केले. या पद्धतीमुळे साधारण ४८ आठवड्यांचेच वेतन मिळू लागले.

Diwali Bonus History

|

Sakal

आंदोलने

त्यामुळे कर्मचाऱ्यांना साधारण ४ आठवड्यांचे वेतन कमी मिळू लागले, ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मुंबईतील कापड गिरणी कामगारांनी आणि विविध कामगार संघटनांनी एकत्र येत अनेक वर्षे तीव्र आंदोलने केली.

Diwali Bonus History

|

Sakal

१० टक्के 'वॉर बोनस'

पहिल्या महायुद्धाच्या काळात १९१७ मध्ये मुंबईतील काही कापड गिरण्यांनी वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी कामगारांना १० टक्के 'वॉर बोनस' दिला होता. त्यानंतर १९१८ मध्ये हा बोनस १५ टक्क्यांपर्यंत वाढला.

Diwali Bonus History

|

Sakal

महिन्याच्या वेतनाइतका बोनस

१९१९ ते १९२२ या काळात मुंबईतील गिरणी कामगारांना एका महिन्याच्या वेतनाइतका बोनस देण्याची शिफारस करण्यात आली होती.

Diwali Bonus History

|

Sakal

१३ व्या महिन्याचा पगार

अखेर १९४० च्या सुमारास दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांनी यावर तोडगा काढत कर्मचाऱ्यांना १३ व्या महिन्याचा पगार देण्याची पद्धत सुरू केली, असल्याचे काही रिपोर्ट्स आहेत.

Diwali Bonus History

|

Sakal

दिवाळी बोनस

पुढे स्वातंत्र्यानंतर याच अतिरिक्त वेतनाला दिवाळी बोनस म्हणून ओळखले जाते.

Diwali Bonus History

|

Sakal

'पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट'

दरम्यान, १९६५ मध्ये भारतीय सरकारकडून 'पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट' लागू करण्यात आला. या कायद्यानुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनाच्या किमान ८.३३ टक्के बोनस देण्याची तरतूद होती.

Diwali Bonus History

|

Sakal

'कोड ऑन वेजेस, २०१९'

तथापि, २१ नोव्हेंबर २०२५ पासून 'कोड ऑन वेजेस, २०१९' लागू झाला असून बोनससंबंधी तरतुदी या कायद्याअंतर्गत येतात.

Diwali Bonus History

|

Sakal

ऋषिकेश-हरिद्वार अशा ठिकाणी गंगा आरती का केली जाते?

Ganga Aarti

|

Sakal

येथे क्लिक करा