Pranali Kodre
उत्तर भारतातील ऋषिकेश, हरिद्वार, वाराणसी, अशा अनेक ठिकाणी केली जाणारी गंगा आरती प्रसिद्ध आहे.
Ganga Aarti
Sakal
भारतात गंगा नदीला अत्यंत पवित्र आणि जीवनदायिनी मानले जाते. गंगा नदीकडे केवळ पाण्याचा स्त्रोत म्हणून नाही, तर पवित्रता, नवचैतन्य आणि संरक्षणाचे प्रतिक म्हणून पाहिले जाते.
Ganga Aarti
Sakal
नदी आपल्याला शेतीसाठी पाणी, पिण्यासाठी पाणी देते. त्यामुळे गंगा नदीप्रती संध्याकाळी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोठे दिवे प्रज्वलित करून आरती केली जाते.
Ganga Aarti
Sakal
पौराणित कथेनुसार राजा भगीरथाने प्रचंड तपश्चर्या करून स्वर्गातून गंगेला पृथ्वीवर आणले. या नदीत स्नान केल्याने पापे नष्ट होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
Ganga Aarti
Sakal
गंगा आरतीमध्ये अग्नी (दीपक), जल (गंगा नदी), वायू (धूप/सुगंध), आकाश आणि पृथ्वी (फुले) या पंचमहाभूतांबद्दलही कृतज्ञता व्यक्त करण्याचाही प्रतीकात्मक अर्थ लावला जातो.
गंगा आरतीमधील घंटानाद, शंखनाद आणि मंत्रोच्चार यांमुळे वातावरणात सकारात्मकता निर्माण होते.
Ganga Aarti
Sakal
थोडक्यात सांगायचं झालं तर गंगा आरती म्हणजे केवळ धार्मिक विधी नसून दिवसभर जीवनाला आधार देणाऱ्या निसर्गशक्तीप्रती आभार मानण्याचं प्रतीक म्हणूनही गंगा आरतीकडे पाहिलं जातं.
Shatrughana Ghat, Rishikesh
Sakal