भारतात डीजेची एन्ट्री कशी झाली?

सकाळ डिजिटल टीम

पहिली सुरुवात

भारतात १९७० च्या उत्तरार्धात आणि १९८० च्या दशकात डीजे संस्कृतीचे आगमन झाले. मुंबईतील नाईट क्लब्स आणि गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवरून या पाश्चिमात्य संगीताचा प्रवास सुरू झाला.

The Rise of DJ Culture in India

|

sakal 

गोव्यातील पार्ट्यांनी दिली दिशा

१९८० मध्ये गोव्यात येणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या अ‍ॅसिड हाऊस आणि ट्रान्स म्युझिक पार्ट्यांमुळे भारतीय तरुणांमध्ये इलेक्ट्रॉनिक संगीताची क्रेझ वाढू लागली.

The Rise of DJ Culture in India

|

sakal 

डीजे संजय दत्ता आणि पहिली क्लब लाट

१९९० च्या दशकाच्या सुरुवातीला डीजे संजय दत्ता (DJ Sanjay Dutta) यांनी भारतात हाऊस आणि ट्रान्स म्युझिक लोकप्रिय करत डीजेला एक स्वतंत्र व्यावसायिक ओळख मिळवून दिली.

The Rise of DJ Culture in India

|

sakal 

एमटीव्ही आणि चॅनल व्हीचा प्रभाव

१९९० च्या काळात एमटीव्ही (MTV) आणि चॅनल व्ही (Channel V) या संगीत वाहिन्यांचे आगमन झाले. यामुळे पाश्चिमात्य पॉप आणि इलेक्ट्रॉनिक संगीत भारतीय घराघरांमध्ये सहज पोहोचले.

The Rise of DJ Culture in India

|

sakal 

बॉलिवूड रिमिक्सचा सुवर्णकाळ

१९९० च्या उत्तरार्धात जुन्या गाण्यांना नवीन बीट्स देऊन रिमिक्स करण्याची लाट आली. या काळात डीजे अकील (DJ Aqeel) आणि डीजे सुकेतू (DJ Suketu) यांनी हे संगीत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले.

The Rise of DJ Culture in India

|

sakal 

लग्न अन् सणांमध्ये डीजेचा प्रवेश

बॉलिवूड रिमिक्समुळे डीजे क्लब संस्कृतीच्या बाहेर पडला. हळूहळू लग्नसोहळे, गणेशोत्सव आणि नवरात्रीच्या मिरवणुकांमध्ये डीजे लोकप्रिय बनला.

The Rise of DJ Culture in India

|

sakal 

'सनबर्न'ने बदललेले संपूर्ण चित्र

२००७ मध्ये गोव्यात सुरू झालेल्या 'सनबर्न फेस्टिव्हल'ने (Sunburn Festival) भारताला जागतिक ईडीएम (EDM) नकाशावर आणले आणि डीजे संस्कृतीला भव्य स्वरूप दिले.

The Rise of DJ Culture in India

|

sakal 

न्यूक्लियस अन् डीजे चेतस

न्यूक्लिया (Nucleya), डीजे चेतस आणि डीजे एनवायके (DJ NYK) सारख्या कलाकारांनी लोकसंगीत आणि देसी बीट्सचा वापर करत भारतीय डीजे संगीताला जगभरात नवी ओळख मिळवून दिली.

The Rise of DJ Culture in India

|

sakal 

डीजेवर मर्यादा

आज क्लबपासून थेट सण-उत्सवांपर्यंत डीजे भारतीय मनोरंजनाचा भाग बनला आहे, पण वाढत्या ध्वनीप्रदूषणामुळे त्यावर मर्यादाही येत आहेत.

The Rise of DJ Culture in India

|

sakal 

नेपाळ देशात राजेशाहीचा अंत कसा झाला?

Nepal Palace Massacre: How Monarchy Ended!

|

sakal 

आणखी वाचा