नेपाळ देशात राजेशाहीचा अंत कसा झाला?

सकाळ डिजिटल टीम

एका हत्याकांडाने बदलला इतिहास

१ जून २००१ ची ती रात्र नेपाळच्या इतिहासाला कलाटणी देणारी ठरली. राजवाड्यात घडलेल्या भयानक हत्याकांडाने शतकानुशतके चालत आलेली राजेशाही संपवून देशात लोकशाहीचा मार्ग मोकळा केला.

Nepal Palace Massacre: How Monarchy Ended!

|

sakal 

१ जून २००१ ची ती काळरात्र

नेपाळचे राजा वीरेंद्र यांनी नारायणहिती राजवाड्यात कौटुंबिक स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. सर्व राजघराणे आनंदाच्या वातावरणात एकत्र जमले होते.

Nepal Palace Massacre: How Monarchy Ended!

|

sakal 

नशेत असलेला युवराज

पार्टीदरम्यान युवराज दीपेंद्र अतिमद्यपानामुळे कोसळले. त्यांना इतर राजपुत्रांनी उचलून बेडरूममध्ये झोपवले, पण काही वेळातच ते लष्करी गणवेशात बाहेर आले.

Nepal Palace Massacre: How Monarchy Ended!

|

sakal 

हातात रायफल

हातात ९ एमएम पिस्तूल आणि एम-१६ रायफल घेऊन युवराज दीपेंद्र बिलियर्ड्स रूममध्ये आले. त्यांनी काही न बोलता थेट वडिलांवर म्हणजेच राजा वीरेंद्र यांच्यावर गोळीबार सुरू केला.

Nepal Palace Massacre: How Monarchy Ended!

|

sakal 

लग्नाच्या वादातून भडकलेला राग

दीपेंद्र यांना त्यांच्या आवडीच्या मुलीशी लग्न करायचे होते, पण राणी ऐश्वर्य आणि आजीचा त्याला तीव्र विरोध होता. पदवी हिरावून घेण्याच्या धमकीमुळे दीपेंद्र प्रचंड निराश आणि चिडले होते.

Nepal Palace Massacre: How Monarchy Ended!

|

sakal 

संपूर्ण कुटुंबाचा संहार

दीपेंद्र यांनी काका धीरेंद्र, आई राणी ऐश्वर्य आणि भाऊ निराजन यांच्यासह राजघराण्यातील १० जणांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली.

Nepal Palace Massacre: How Monarchy Ended!

|

sakal 

स्वतःवर झाडली गोळी

कौटुंबिक नरसंहार केल्यानंतर दीपेंद्र यांनी राजवाड्याच्या बागेतील पुलावर जाऊन स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली.

Nepal Palace Massacre: How Monarchy Ended!

|

sakal 

बेशुद्ध अवस्थेत बनले राजा

गंभीर जखमी झालेल्या दीपेंद्र यांना रुग्णालयात नेण्यात आले. राजा वीरेंद्र यांच्या मृत्यूनंतर कोमात असलेल्या दीपेंद्र यांनाच नेपाळचा नवा राजा घोषित करण्यात आले.

Nepal Palace Massacre: How Monarchy Ended!

|

sakal 

५४ तासांचे राज्य आणि शेवट

बेशुद्ध अवस्थेत ५४ तास राजा राहिल्यानंतर ४ जून रोजी दीपेंद्र यांचा मृत्यू झाला. त्यानंतर ज्ञानेंद्र राजा बनले, पण या घटनेने नेपाळमधील राजेशाहीचा पाया कायमचा हादरवला.

Nepal Palace Massacre: How Monarchy Ended!

|

sakal 

नेपाळ देशात 'स्वातंत्र्यदिन' का साजरा होत नाही?

Why Nepal Has No Independence Day

|

sakal 

आणखी वाचा