संतोष कानडे
पुरातत्त्वीय संशोधनानुसार, शेती आणि पशुपालन सुरू होण्याच्या आधीपासूनच मानव जंगली बकऱ्यांची शिकार करून त्यांचे मांस खात होता.
पश्चिम आशियामध्ये सुमारे १२ ते १३ हजार वर्षांपूर्वी जंगली बकऱ्यांच्या शिकारीचे पुरावे आढळतात.
बकऱ्यांचे पाळीव प्राण्यांमध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया सुमारे १० हजार वर्षांपूर्वी सुरू झाली.
सध्याच्या इराणमधील झाग्रोस पर्वतरांगांमध्ये बकरीपालनाचे अतिप्राचीन पुरावे सापडले आहेत.
तेथील गंज दारेह या पुरातत्त्वीय स्थळावर सुमारे १० हजार वर्षांपूर्वीच्या बकऱ्यांची हाडे आढळली आहेत.
या हाडांच्या अभ्यासातून माणसे नर बकऱ्यांची लहान वयातच कत्तल करत असल्याचे संकेत मिळाले आहेत.
प्रजननासाठी मादी आणि काही नर बकऱ्यांना जिवंत ठेवण्याची पद्धतही तेव्हा विकसित झाली होती.
कालांतराने पशुपालनाचा प्रसार झाल्यामुळे बकरी मांस, दूध आणि कातडी मिळवण्याचे महत्त्वाचे साधन बनली.
बकऱ्याचे मांस खाण्याची परंपरा हजारो वर्षे जुनी असून, त्याची सुरुवात नेमक्या कोणत्या वर्षी झाली हे मात्र सांगता येत नाही.
Refrigerator
esakal