संतोष कानडे
फ्रीजमध्ये पदार्थ उघडे ठेवल्यास त्यांच्या गुणवत्तेवर आणि ताजेपणावर परिणाम होऊ शकतो.
फ्रीजमध्ये थंडावा निर्माण करण्यासाठी रेफ्रिजरंट गॅसचा वापर केला जातो.
मात्र हा गॅस बंद पाईपमधून फिरत असल्याने सामान्य परिस्थितीत त्याचा अन्नपदार्थांशी थेट संपर्क येत नाही.
त्यामुळे फ्रीजमधील गॅसमुळे उघडे पदार्थ विषारी होतात, असे नाही.
मात्र गॅसची गळती झाल्यास काही प्रकारच्या रेफ्रिजरंटमुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
दुसरीकडे, फ्रीजमधील थंड हवेच्या संपर्कामुळे उघड्या भाज्या आणि फळांमधील ओलावा कमी होऊ शकतो.
कांदा, लसूण किंवा इतर पदार्थांचा वासही अन्नपदार्थांना लागू शकतो. कच्चे मांस किंवा मासे उघडे ठेवल्यास त्यांतील जंतू इतर पदार्थांपर्यंत पोहोचू शकतात.
त्यामुळे अन्नपदार्थांची चव, वास आणि गुणवत्ता टिकवण्यासाठी ते झाकणाच्या डब्यात ठेवणे योग्य ठरते.
फळे आणि भाज्यांचा ताजेपणा कमी होऊन ती लवकर सुकू शकतात. काही पदार्थांवर थंड हवेमुळे पापुद्रा तयार होऊ शकतो.
फ्रीजमधील पदार्थ नेहमी स्वच्छ आणि झाकण असलेल्या डब्यांमध्ये ठेवणे योग्य ठरते.
पदार्थ झाकून ठेवल्याने त्यांचा ताजेपणा, चव आणि गुणवत्ता टिकवण्यास मदत होते.
Birds
esakal