Mansi Khambe
चेनई येथील फोर्ट सेंट जॉर्जी इतिहासाशी जोडलेला एक महत्त्वपूर्ण वारसा जतन करण्यात आला आहे.
Indian Flag history
ESakal
फोर्ट सेंट जॉर्ज संग्रहालयातील इंडियन इंडिपेंडन्स गॅलरी'मध्ये १२ फूट लांब आणि आठ फूट रुंद शुद्ध रेशमी कापडाचा राष्ट्रध्वज जतन करून ठेवण्यात आला आहे.
Indian Flag history
ESakal
१५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र भारतात फडकविण्यात आलेल्या पहिल्या राष्ट्रध्वजांपैकी हा एक ध्वज आहे. त्या ऐतिहासिक दिवसाच्या आठवणी जपणाऱ्या मोजक्या ध्वजांपैकी तो एक आहे.
Indian Flag history
ESakal
१५ ऑगस्ट १९४७ रोजी पहाटे ५.३० वाजता हा ध्वज फडकविण्यात आला. शतकानुशतके परकीय राजवटीचा सामना केलेल्या देशासाठी तो क्षण आनंद, अभिमान आणि सुटकेची भावना देणारा होता.
Indian Flag history
ESakal
मात्र या ऐतिहासिक क्षणापर्यंत पोहोचण्याचा भारताचा प्रवास दीर्घ आणि खडतर होता. या प्रवासासोबत भारताच्या राष्ट्रध्वजाचे स्वरूपही अनेक टप्प्यांतून विकसित झाले.
Indian Flag history
ESakal
भारतीय राष्ट्रध्वजाचा इतिहास हा केवळ एका राष्ट्रीय प्रतीकाच्या निर्मितीचा नाही. तो भारताच्या स्वनिर्णयाच्या अधिकारासाठी सुरू असलेल्या संघर्षाची गाथाही आहे.
Indian Flag history
ESakal
या प्रवासाची सुरुवात १९०६ मध्ये स्वदेशी आणि बहिष्कार आंदोलनाच्या काळात झाली. त्यावेळी कलकत्ता येथे पहिल्यांदा ध्वजारोहण करण्यात आले.
Indian Flag history
ESakal
आजच्या राष्ट्रध्वजापेक्षा वेगळ्या स्वरूपाचा हा ध्वज ब्रिटिश राजवटीविरोधात वाढत चाललेल्या प्रतिकाराचे प्रतीक होता. काळ पुढे सरकत गेला आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासोबत राष्ट्रध्वजाचे स्वरूपही बदलले.
Indian Flag history
ESakal
१९०७ मध्ये मादाम भिकाजी कामा यांनी जर्मनीतील स्टुटगार्टमध्ये १९०६मध्ये ध्वजारोहण केलेल्या ध्वजाशी साधर्म्य असलेला ध्वज फडकावला. त्यातून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा संदेश आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला.
Indian Flag history
ESakal
१९२१ मध्ये पिंगली वेंकय्या यांनी तयार केलेल्या ध्वजाला आजच्या राष्ट्रध्वजाशी साधर्म्य असलेले स्वरूप प्राप्त झाले. त्यांच्या रचनेतील तीन पट्टे भारतातील विविध समुदायांचे प्रतिनिधित्व करणारे होते.
Indian Flag history
ESakal
विविधतेत एकतेचा संदेश त्यातून देण्यात आला. मध्यभागी असलेले चरख्याचे चिन्ह भारताच्या आर्थिक स्वावलंबनाचे प्रतीक होते.
Indian Flag history
ESakal
राष्ट्रध्वजातील अंतिम महत्त्वाचा बदल १९३१ मध्ये झाला. त्यावेळी ध्वजाचे रंग निश्चित करण्यात आले.
Indian Flag history
ESakal
केशरी रंग शौर्याचा, पांढरा शांततेचा; हिरवा रंग सुपीकता आणि विकासाचे प्रतीक मानण्यात आला. पुढे चरख्याऐवजी अशोकचक्राचा स्वीकार करण्यात आला. ते शाश्वत धर्म, कायदा आणि प्रगतीचे प्रतीक मानले गेले.
Indian Flag history
ESakal
२२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेने भारताचा राष्ट्रध्वज औपचारिकरीत्या स्वीकारला. तोच आज आपण आदराने 'तिरंगा' म्हणून ओळखतो.
Indian Flag history
ESakal
15 August Independence Day
ESakal