भारतासोबत आणखी चार देशांचा स्वातंत्र्य दिन, तुम्हाला माहितेय का?

सकाळ वृत्तसेवा

स्वातंत्र्य दिन

भारताचा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्टला साजरा केला जातो. १९४७ मध्ये याच दिवशी भारत ब्रिटिशांच्या जवळपास दोन शतकांच्या राजवटीतून मुक्त झाला.

15 August Independence Day

|

ESakal

इतिहास

देशाच्या इतिहासात १५ ऑगस्टला विशेष स्थान आहे; मात्र भारताबरोबरच जगातील काही अन्य देशांसाठीही हा दिवस ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे.

15 August Independence Day

|

ESakal

कोरिया

उत्तर आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांमध्ये १५ ऑगस्टला 'ग्वांगबोकजोल' अर्थात मुक्तिदिन साजरा केला जातो. १९४५ मध्ये जपानच्या ३५ वर्षांच्या राजवटीचा अंत झाल्याचे प्रतीक म्हणून हा दिवस महत्त्वाचा आहे.

15 August Independence Day

|

ESakal

जपानचा पराभव

मात्र जपानच्या पराभवानंतर कोरियाची विभागणी झाली. पुढे १९४८ मध्ये उत्तर आणि दक्षिण कोरिया अशी दोन स्वतंत्र राष्ट्र अस्तित्वात आली.

15 August Independence Day

|

ESakal

बहरीन

बहरीनने १५ ऑगस्ट १९७१ रोजी ब्रिटनपासून स्वातंत्र्य घोषित केले. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वेक्षणातून बहरीनच्या जनतेला स्वतंत्र राष्ट्र म्हणून राहण्याची इच्छा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हा निर्णय झाला.

15 August Independence Day

|

ESakal

ब्रिटिश राजवटीचा अंत

मात्र देशाचा राष्ट्रीय दिन १६ डिसेंबरला साजरा केला जातो. त्यामुळे १५ ऑगस्टला बहरीनमध्ये भारताप्रमाणे सार्वजनिक उत्सव होत नाही.

15 August Independence Day

|

ESakal

काँगो प्रजासत्ताक

आफ्रिकेतील काँगो प्रजासत्ताकला १५ ऑगस्ट १९६० रोजी फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले. ब्राझाव्हिल येथे राष्ट्रीय दिनानिमित्त विविध कार्यक्रम, मिरवणुका आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते.

15 August Independence Day

|

ESakal

काँगो लोकशाही

हा देश काँगो लोकशाही प्रजासत्ताकपेक्षा वेगळा आहे. काँगो लोकशाही प्रजासत्ताकचा स्वातंत्र्य दिन ३० जून रोजी असतो.

15 August Independence Day

|

ESakal

लिक्टेनस्टाइन

युरोपातील लिक्टेनस्टाइनमध्ये १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन नसून राष्ट्रीय दिन आहे. धार्मिक आणि राजघराण्याशी संबंधित दोन घटनांच्या स्मरणार्थ ही तारीख निवडण्यात आली.

15 August Independence Day

|

ESakal

राष्ट्रनिर्मितीचे प्रतीक

भारतासाठी १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य, बलिदान आणि राष्ट्रनिर्मितीचे प्रतीक आहे. वर उल्लेख केलेल्या देशांसाठी तो मुक्ती, राष्ट्रीय अस्मिता किंवा ऐतिहासिक परिवर्तनाची आठवण करून देणारा दिवस आहे.

15 August Independence Day

|

ESakal

दृष्टिहीन व्यक्तींना दिवस आणि रात्र कशी समजते? पाहा विज्ञान काय सांगतं

Blind People Recognize Day & Night

|

ESakal

येथे क्लिक करा