Yashwant Kshirsagar
कपड्यांवरील सुरकुत्या काढण्याची ही प्रथा हजारो वर्षांपूर्वीपासून चालत आली आहे. आज Gen Z चुरगळलेले कपडे घालत असले तरी, बहुतेक भारतीयांना इस्त्री न केलेले कपडे अजिबात आवडत नाहीत!
Clothes Iron History
esakal
इसवी सनापूर्वी ४०० वर्षांपूर्वी प्राचीन ग्रीसमध्ये तापवलेल्या लोखंडी सळ्यांनी कपड्यांवर प्लेट्स पाडल्या जात असत. प्राचीन चीनमध्ये गरम कोळसा भरलेल्या धातूच्या पात्राने कपडे सरळ केले जात.
Clothes Iron History
esakal
ब्रिटिश येण्यापूर्वीही भारतात इस्त्रीच्या स्वतःच्या पद्धती होत्या. केरळमध्ये नारळाच्या करवंट्या जाळून त्यांचा वापर कपड्यांना इस्त्री करण्यासाठी केला जायचा. आजही वीज नसलेल्या ठिकाणी ही पद्धत वापरली जाते.
Clothes Iron History
esakal
'इस्त्री' हा शब्द भारतीय नाही! तो पोर्तुगीज भाषेतील 'esticar' या शब्दावरून आला आहे, ज्याचा अर्थ 'ओढणे' किंवा 'ताणणे' असा होतो. पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी हे उपकरण भारतात आणले.
Clothes Iron History
esakal
ब्रिटिश लोक कपड्यांच्या इस्त्रीबाबत फार काटेकोर होते. ते स्टार्च लावून कपडे इतके कडक इस्त्री करत की, त्यांच्या पोशाखांवरील प्रत्येक घडी परफेक्ट दिसे.
Clothes Iron History
esakal
८व्या-९व्या शतकात वायकिंग्स गुळगुळीत दगड वापरत. मध्ययुगात युरोपमध्ये "सॅड आयर्न" (घन इस्त्री) आली. यात जड लोखंडाचा त्रिकोणी तुकडा आगीवर तापवून वापरला जायचा.
Clothes Iron History
esakal
नंतर कोळशाने भरलेल्या पोकळ लोखंडी पेटीतून बनवलेल्या बॉक्स-इस्त्री आल्या. यामुळे उष्णता जास्त काळ टिकत असे आणि इस्त्री करणे सोपे झाले.
Clothes Iron History
esakal
१९व्या शतकात जर्मनीमध्ये अल्कोहोलवर चालणारी इस्त्री (Spirit Iron) शोधली गेली. यात अल्कोहोलची टाकी, बर्नर आणि नियंत्रण झडप असे. अल्कोहोल वाफ होऊन उष्णता निर्माण होत असे.
Clothes Iron History
esakal
इस्त्रीत अल्कोहोलची टाकी,बर्नर ,पातळ नळी, गरम तळ. व्हेंटिलेशन होल्समुळे हवा खेळती राहून ज्योत व्यवस्थित जळत असे. हँडल फिरवून अल्कोहोलचा प्रवाह नियंत्रित करता येत असे.
Clothes Iron History
esakal
कोळसा, दगड, अल्कोहोल आणि गॅसनंतर आली विजेची इस्त्री. आज प्रत्येक घरात हीच प्रमाणभूत आहे. इस्त्रीची ही हजारो वर्षांची रंजक यात्रा अजूनही सुरू आहे!
Clothes Iron History
esakal
Best Beaches in Mumbai
esakal