सकाळ डिजिटल टीम
मुंबई या शहराचे जुने नाव काय होते हे तुम्हाला माहित आहे का?
मुंबई शहराच्या नावाचा नेमका इतिहास काय आहे?, मुंबई हे नाव कसे पडले या बद्दल माहित आहे का?
मुंबई शहराला मुंबई हे नाव कसे पडटले व मुंबईला पूर्वी काय म्हणत होते जाणून घ्या.
मुंबईचे जुने नाव बॉम्बे होते. 1995 मध्ये या शहराचे नाव बदलून मुंबई करण्यात आले.
मुंबई हे नाव 'मुंबा देवी' नावाच्या स्थानिक देवीवरून ठेवण्यात आले आहे, असे म्हंटले जाते.
पोर्तुगीजांनी या शहराला 'बोम्बाईम' असे नाव दिल्याचे इतिहासात सांगण्यात येते.
इंग्रजांनी त्याला 'बॉम्बे' असे म्हटले, आणि ते ब्रिटीश राजवटीत प्रसिद्ध झाल्याचे ही म्हंटले जाते.
1995 मध्ये, हे नाव अधिकृतपणे 'मुंबई' असे बदलण्यात आले.
मुंबई, बम्बई आणि बॉम्बे ही तीनही स्त्रीलिंगी नावे एकाच वेळी प्रचलित होती. काहीजण या नगरीला मुंबापुरी म्हणतात